Headlines

राज्यात पुन्हा मुसळधार:पुणे, नाशिक, कोकणासह विदर्भातही जोरदार पावसाचा अलर्ट, मराठवाड्यातही पावसाची शक्यता

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार हजेरी लावल्यानंतर काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. आज हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, मुंबईत ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, ठाणे, पालघर, रायगडसह…

Read More

मूर्तिजापूर तालुक्यातील 15 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत:विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात;”पांढऱ्या कागदावर काळा खेळ’ सुरू असल्याचा प्रशासनावर ग्रामस्थांकडून आरोप‎

तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, १५ शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. कागदोपत्री दुरुस्ती, देखभाल व विकासकामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. . तालुक्यातील भटोरी शाळेतील विद्यार्थी भिंतीला तडे गेलेल्या वर्गखोल्यांमधे बसून शिक्षण घेत आहेत. गत ५० ते ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या व…

Read More

सेन्सेक्समध्ये 300 अंकांची घसरण:77,100 वर व्यवहार सुरू, निफ्टीतही 100 अंकांची घसरण; आयटी, बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच २२ जुलै रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३०० अंकांनी अधिक घसरणीसह ७७,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही सुमारे १०० अंकांची घसरण आहे, तो २४,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये आज जास्त विक्री आहे. आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवहार २१ जुलै रोजी अमेरिकन बाजारात वाढ झाली होती…

Read More

नगरसेवक नीलेश देव यांचे आंदोलन स्थगित:मागण्यांवर निर्णय घेण्याचे मनपाचे आश्वासन‎

नागरिकांच्या मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांसाठी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक नीलेश देव यांनी सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून महानगरपालिका मुख्यालयाजवळ सुरू केलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन रात्री स्थगित केले. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आंदोलनातील सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. दिवसभर विविध राजकीय, सामाजिक व नागरिक क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट…

Read More

सोनम वांगचुक गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात:बाहेर हरियाणा – दिल्ली पोलिसांची थ्री लेयर सुरक्षा; नड्डा, जितेंद्र सिंहांनी केली विचारपूस

लडाखच्या समस्या आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ गेल्या 25 दिवसांपासून उपोषण करत असलेले सोनम वांगचुक यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता दिल्ली पोलिसांची पथके त्यांना सफदरजंग रुग्णालयातून येथे घेऊन पोहोचली. रुग्णालयात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हरियाणा आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात आहेत. रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही…

Read More

पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम; दिले सुरक्षेचे धडे:सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, महिला व बालक सुरक्षा, व्यसनमुक्त समाजासाठी श्री शिवाजी महाविद्यालयात जागृती‎

विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, महिला व बालक सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन तसेच व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आय . प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात पोलिस उपनिरीक्षक समाधान…

Read More

हे कटू सत्य स्वीकारायला माझं मन आजही तयार होत नाही:अजितदादांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावुक पोस्ट

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची आज जयंती आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या अत्यंत दुर्दैवी विमान अपघातात अजितदादांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतरची ही पहिलीच जयंती असल्याने संपूर्ण राज्यभरात आणि पवार कुटुंबात अत्यंत भावूक वातावरण आहे. राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय…

Read More

सिल्लोड येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम:प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांसमोर उलगडले चमत्कारांचे वैज्ञानिक सत्य‎

येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात समाज कल्याण विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन कायद्या’अंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष . मुख्याध्यापक निशांत मस्के यांनी हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न…

Read More

Nihang Assault Youth In Ludhiana Over Controversial Social Media Post

मानव, होशियारपूर8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोशल मीडियावरील निहंगांविषयीच्या एका पोस्टखाली वादग्रस्त टिप्पणी करणे एका तरुणाला महागात पडले. निहंग होशियारपूरहून थेट लुधियानाला पोहोचले. तिथे त्यांनी त्या तरुणाला मारहाण केली. आधी त्याला काठीने मारले. नंतर थप्पड मारले. त्यानंतर तरुणाकडून माफीही मागवून घेतली. याचा व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल करण्यात आला. निहंगांचे म्हणणे आहे की, काही लोक अश्लील कमेंट…

Read More

दिल्लीतील लाठीमार प्रकरणाची‎ चाैकशी करून कारवाई करावी‎:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

नीट पेपरफुटीची आणि आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जखमी विद्यार्थी व पोलिस कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार व आर्थिक मदत द्यावी. विद्यार्थी प्रतिनिधींशी तातडीने सकारात्मक संवाद साधावा, असेही राकाँचे नेते म्हणाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ३…

Read More