रामाच्या नावावर सत्ता, श्रद्धेचा बाजार नाही:अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणावरून अरविंद सावंतांचा भाजपवर हल्लाबोल
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधातील आक्रमक भूमिका आणखी तीव्र केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत राम मंदिरासमोर रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात सहभागी होत भाजपवर जोरदार टीका केली. “प्रभू रामचंद्रांच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडून सत्ता मिळवणाऱ्यांना हिंदूंनी ओळखण्याची वेळ आली आहे,” असा घणाघात त्यांनी केला….