नितीन गडकरींची इथेनॉलवरून सोशल मीडियावर बदनामी:युट्यूबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हा दाखल
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी बिहारच्या एका युट्यूबरला मोठा फटका बसला आहे. इथेनॉल निर्मितीच्या मुद्द्यावरून मंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी युट्यूबर मनीष कश्यपसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी शिशिर त्रिपाठी, संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी…