Headlines

नागपूर पोलिसांना ड्रग टेस्टिंग किट्स, ब्रेथ ॲनालायझर्स प्रदान:समृद्धी महामार्गावर सुरक्षित ड्रायव्हिंगला मिळणार बळकटी

समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि मर्सिडीज बेंझ इंडिया यांच्या सहकार्याने नागपूर शहर पोलिसांना अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स आणि ब्रेथ ॲनालायझर्स प्रदान करण्यात आले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल आणि सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक व सीईओ पियुष तिवारी यांच्या उपस्थितीत ही उपकरणे औपचारिकरित्या सुपूर्द…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:आरोपी निदा खानच्या जामिनावर 2 मे रोजी निकाल; न्यायालयात सुनावणी पूर्ण

नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या प्रकरणातील आपला निकाल राखून ठेवला असून, तो 2 मे रोजी दिला जाईल असे म्हटले आहे. ज्या 8 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, त्यांपैकी निदा खान एक आहे. निदा खानने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला…

Read More

गैरव्यवहाराच्या मुद्द्यांनी चांदवडची सभा वादळी:शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांना भाजपमधील काही नगरसेवकांचाही पाठिंबा‎

नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष वैभव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. तब्बल पाच तास चाललेली ही सभा शिवसेना नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या भंगाराच्या कथित गैरव्यवहारासह घनकचरा व्यवस्थापनातील अनियमिततेच्या प्रश्नांवरुन गाजली. या मुद्द्यांवर भाजपातील काही नगरसेवकांनीही पाठिंबा दिल्याने या मुद्यांवर उत्तरे देताना प्रशासनाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. सभेत विविध ६५ विषयांवर चर्चा होऊन…

Read More

पुणे–बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री गोळीबार:कालगावच्या सरपंचाकडून व्यावसायिकावर हल्ला, पैशांच्या वादातून गोळ्या झाडल्याचा आरोप

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड शहराजवळील इंदोली फाटा परिसरात शनिवारी मध्यरात्री झालेल्या थरारक गोळीबारामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. व्यावसायिक व्यवहारातील पैशांच्या हिशोबावरून झालेल्या वादातून कालगावचे सरपंच सोमनाथ चव्हाण यांनी संतोष घोलप यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असून, या हल्ल्यात घोलप गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक…

Read More

शून्य सावलीपाठोपाठ ३१ मे रोजी दिसणार 'ब्लू मून':अमरावतीत एकाच आठवड्यात दोन खगोलीय घटना

निसर्ग आणि अवकाशाची सफर करणाऱ्या खगोलप्रेमींसाठी मे महिन्याचा शेवट एक अत्यंत दुर्मिळ आणि वेधक अनुभूती घेऊन येत आहे. आता दोन दिवसानंतर, पंचवीस मे रोजी ‘शून्य सावली’चा थरारक अनुभव येईल. त्यानंतर ३१ मे रोजी रात्री आकाशात ‘ब्लू मून’ दिसणार आहे. एकाच कॅलेंडर महिन्यात दोन वेळा पौर्णिमा येण्याच्या या अनोख्या खगोलशास्त्रीय घटनेमुळे स्थानिक खगोल अभ्यासकांमध्ये कमालीची उत्सुकता…

Read More

भूमी अभिलेखच्या कारभाराविरुद्ध तीन महिलांचे उपोषण:न्यायालयीन प्रकरण सुरू असताना कर्मचाऱ्यांनी परस्पर केली मोजणी‎

येथील उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयातील कथित भ्रष्ट व वादग्रस्त कारभाराला कंटाळून अखेर तीन महिलांनी सोमवारपासून (दि.६) कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शुभांगी प्रवीण ठाकरे, राजकन्या साहेबराव ठाकरे व शोभाबाई भुजंगराव बरडे अशी उपोषणास बसलेल्या महिलांची नावे आहेत. भूमी अभिलेखच्या इतिहासात तीन महिलांनी एकत्र येत आमरण उपोषणाचे पाऊल उचलण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात खळबळ…

Read More

लासूरगावच्या शिवना नदीवरील पुलाचे संरक्षण कठडे तुटले:ठिकठिकाणी खड्डे, भानवाडी येथील टोलवसुली बंद करा, आमदार प्रशांत बंब यांची मागणी‎

लासूर स्टेशन ते वैजापूर जाणाऱ्या लासूरगाव जवळील शिवना नदीवरील पुलाची झालेली जर्जर अवस्था, तुटलेले संरक्षण कठडे, खड्डेमय रस्ता असताना दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भानवाडी येथील टोल वसुलीबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी नुकतीच संबंधित विभागाकडे पत्रकाद्वारे केली आहे. प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जुना…

Read More

जनआरोग्य योजनेतील गैरप्रकार त्वरित थांबवा:भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीची मागणी‎

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काही रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पूर्णपणे मोफत उपचार मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन व यशवंत मोफत रुग्णसेवा समितीने दिला आहे. सटाणा दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांना तालुका सचिव श्याम बागडणे यांनी निवेदन देऊन…

Read More

यूकेमध्ये पंजाबी चालकाला २९ वर्षांची शिक्षा:सेक्स वर्करचा खून केल्याचा आरोप, मृतदेह नग्नावस्थेत कचऱ्यात फेकला; डिझेल टाकून पुरावे नष्ट केल्याचा आरोप

ब्रिटन (यूके) च्या वेस्ट मिडलँड्समध्ये एका सेक्स वर्करच्या हत्येप्रकरणी पंजाबी वंशाच्या एका ड्रायव्हरला (३२) २९ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. वॉल्वरहॅम्पटन क्राउन कोर्टाचे न्यायाधीश मायकल चेंबर्स केसी यांनी हा निर्णय दिला. न्यायाधीशांनी सांगितले की, तनवीर सिंग हा एक चलाख तरुण आहे. त्याच्या शिक्षेत कोणतीही सवलत दिली जाणार नाही. ११ ऑगस्ट २०२५ च्या सकाळी स्मेथविक येथील वुडबर्न…

Read More

Katrina Kaif Birthday Interesting Facts Mahesh Bhatt Salman Khan Vicky Kaushal

17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सुमारे २००० सालची गोष्ट आहे. सुमारे १८ वर्षांच्या कतरिना कैफला अनुराग बासू दिग्दर्शित ‘साया’ हा चित्रपट मिळाला, ज्यात जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होता. हा तिचा मुख्य भूमिकेतील पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला असता. एका रात्री तिला शूटिंगसाठी बोलावण्यात आले. संवाद नव्हते, हावभाव नव्हते, फक्त डमी पासिंग शॉट द्यायचा होता. दुसऱ्या दिवशी तिला…

Read More