Headlines

खत खरेदीत लूट थांबवा; लिंकिंग बंद करा‎:युवक काँग्रेस अाक्रमक; कृषी अधीक्षक कार्यालयावर दिली धडक‎




प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात रासायनिक खतांच्या खरेदीबाबत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून खत विक्रेत्यांकडून लिंकिंग पद्धतीने विक्री, जादा दराने विक्री तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत युवक काँग्रेसने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. कारवाई करण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तथा प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष कपिल ढोके यांनी करत निवेदन सादर केले. उर्वरित पान ४ सरकारने शेतकऱ्यांनी पीक कर्जमाफीची घोषणा केली तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच निकष, अटीही जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे या मुद्द्यावर विरोधकांनी प्रामुख्याने काँग्रेसने महायुती सरकारला घेरण्याची तयारी केली असून, सुरुवात खताच्या मुद्द्यावरुन झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *