70 वर्षीय चालकाचे नियंत्रण सुटले; ट्रकने 3 महिला वारकऱ्यांना चिरडले:ओव्हरटेकच्या नादात सासवड-जेजुरी मार्गावर अपघात
पंढरीकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी दिंडीवर दुसऱ्या दिंडीतील एका ७० वर्षीय आजारी चालकाने ओव्हरटेकच्या नादात ट्रक घातला. यात सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील तीन महिला वारकऱ्यांचा जागीच अंत झाला. तर चौघी जखमी झाल्या. काळाने क्रूर घाला घातला. पुण्याजवळील सासवड-जेजुरी मार्गावर सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झालेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे आषाढी पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली आहे….