Headlines

वाशिममध्ये पेट्रोल पंपावर नकली नोटांचा पर्दाफाश:तेलंगणातील 7 जण ताब्यात, 23.50 लाखांच्या बनावट नोटा जप्त

अमानी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर बनावट नोटांद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत तेलंगणा राज्यातील सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २३ लाख ५० हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे बनावट नोटांचे रॅकेट चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमानी (ता. मालेगाव)…

Read More

35कोटी रुपये खर्च करुन होणार अप्पर वर्धा धरणाजवळ नवा पूल:अमरावती-वर्धा जिल्ह्यांतील वाहतूक वर्षभर राहणार सुरळीत‎

विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासमोरील मोर्शी-सिंभोरा-आष्टी राज्य महामार्गावरील वर्धा नदीवरील जुन्या पुलाऐवजी नवीन उंच पूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत ३५ कोटी रुपयांच्या निधीस म . या पुलामुळे अमरावती व वर्धा जिल्ह्यांतील नागरिकांची अनेक दशकांपासूनची वाहतुकीची समस्या कायमची दूर होणार असून अप्पर वर्धा धरणाच्या पर्यटनालाही मोठी चालना मिळणार…

Read More

छत्रपती संभाजीनगर शहरात 33 तासांत 46 मिमी पावसाची नोंद:अकोला, यवतमाळला आज यलो अलर्ट

शहरात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत ३२.३, तर बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३.७ असा एकूण ३३ तासांमध्ये शहरात ४६ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात २३३.२ मिमी अपेक्षितच्या तुलनेत २२८.९ मिमी (९८.२ टक्के) पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतही पाऊस झाला. मात्र, लातूर, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यात अजूनही चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे संभाजीनगरातील सलीम…

Read More

रॅली:चांदवड येथील जैन विद्यालय व मतदार साक्षरता क्लबतर्फे मतदार जागृती रॅली

येथील श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय व मतदार साक्षरता क्लब (ईएलसी) यांच्या वतीने बुधवारी (दि. १५) चांदवड शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदार साक्षरता आणि मतदार यादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत (एसआयआर) व्यापक जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण व निवडणूक…

Read More

लाडकी बहीण योजनेचे पैसे अडकले? सरकारने दिली आणखी एक मुदत:आता ई-केवायसी नाही केलं तर यादीतून नाव वगळणार

राज्यातील लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून पात्र महिलांना एकाच वेळी तीन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे. मात्र, काही महिलांना पात्र असूनही अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यामागे ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याचे मुख्य कारण समोर आले आहे. त्यामुळे आता…

Read More

व्हॉट्सॲप-फेसबूक-इन्स्टाग्रामचे प्लस व्हर्जन येणार, यासाठी पैसे लागतील:24 तासांनंतरही स्टोरी हटणार नाही, आवडत्या लोकांच्या वेगवेगळ्या याद्या तयार करता येतील

सोशल मीडिया कंपनी मेटाने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केले आहेत. या अंतर्गत ॲप्सचे ‘प्लस’ व्हर्जन रोल आउट केले जात आहेत. हा प्लॅन घेणाऱ्या युजर्सना विशेष टूल्स आणि कस्टमायझेशनचे पर्याय मिळतील. हे पाऊल मेटाच्या जाहिरातींव्यतिरिक्त कमाईचा नवीन स्रोत निर्माण करण्याच्या रणनीतीचा भाग आहे. नवीन प्लस प्लॅन कंपनीच्या सध्याच्या ‘मेटा व्हेरिफाईड’ प्लॅनची जागा…

Read More

पुणे विषारी दारू प्रकरण: तपासासाठी 10 पथके नियुक्त:डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनंतर सीआयडीकडून कारवाईला वेग

पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (CID) कडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, सीआयडीने १० विशेष पथके नियुक्त केली आहेत. शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनंतर ही कारवाई अधिक व्यापक करण्यात आली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाची सुरुवातीपासून गंभीर…

Read More

कन्नडमध्ये १२७०० क्विंटल मका खरेदी:२ कोटी ६९ लाख शेतकऱ्यांना पैसे हस्तांतर

प्रतिनिधी |कन्नड शासकीय हमी भावाने कन्नड तालुक्यात खरेदी करण्यात येत असलेल्या मका खरेदीची मुदत ३० एप्रिलला संपुष्टात आली. आजपर्यंत शासकीय खरेदी केंद्रावर १२७०० क्विंटल मका खरेदी करण्यात आली, अशी माहिती पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार नीलेश राठोड यांनी दिली. तहसील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार राठोड यांनी सांगितले की, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासकीय हमी भावाने कन्नड…

Read More

तहसीलमधील सेतू केंद्रातून विद्यार्थ्यांची लूट:सर्व्हर डाऊनचे कारण सांगून बाहेरील दुकानांकडे पाठवले जात असल्याचा गंभीर आरोप‎

शासनाने नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्रे व शासकीय सेवा सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्राचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सांगोला येथील अधिकृत सेतू केंद्र अनेक वेळा रिकामे दिसत असून, विद्यार्थ्यां व नागरिक यांची खाजगी गाळ्यात कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन प्रवेशासाठी…

Read More

सायबर भामट्यांचा गेम ओव्हर:फसवणूक रोखण्यासाठी आता ‘डिजिटल नाकेबंदी’, हायटेक यंत्रणेद्वारे रिअल टाईम ट्रॅकिंग

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि ऑॅनलाईन आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी राज्यात आता डिजिटल नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे. गृह विभागाच्या आदेशाने सर्व सायबर पोलिस ठाण्यात ही कार्यवाही सुरू झाली आहे. या अत्याधुनिक मोहिमेंंतर्गत संशयित व्यवहार, बनावट काॅल आणि अार्थिक फसवणुकीचे केंद्र ठरणाऱ्या खात्यांना रिअल टाईम रोखले जाईल. खाते फ्रिज, सिम ब्लाॅक, अन् रिअल टाईम ट्रॅकिंग हे…

Read More