Headlines

वीजग्राहकांना प्रॉम्प्ट, ऑनलाईन पेमेंटने 9.60 कोटींची सवलत:महावितरणच्या गो-ग्रीन आणि डिजिटल सेवांचा वापर वाढला

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांनी महावितरणच्या डिजिटल सेवांचा वापर करून मावळत्या आर्थिक वर्षात ९ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळवली आहे. प्रॉम्प्ट बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो-ग्रीन या पर्यायांचा वापर केल्याने ग्राहकांना हा लाभ मिळाला आहे. महावितरण ग्राहकांना विविध सवलती देते. यात, सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून)…

Read More

देवगिरी किल्ल्यावर सारथीची स्वच्छता मोहीम:40 संशोधक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्या वतीने देवगिरी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सारथीच्या ४० संशोधक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ‘सारथी’ संस्थेतर्फे 26 मे ते 25 जून 2026 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 ते…

Read More

नेहरूंचा विक्रम मोडल्याबद्दल अभिनंदन:पण महागाई-बेरोजगारीचेही विक्रम तुमच्याच नावावर, सिद्धिविनायक मंदिरात पुजा करत मनसेचा उपरोधिक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम करत पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला. यानिमित्त भाजपकडून जल्लोष सुरू असतानाच मनसेने मात्र वेगळ्याच पद्धतीने प्रतिक्रिया दिली. सिद्धिविनायक मंदिरात महापूजा करत मनसेने मोदींचे अभिनंदन केले, पण त्याचवेळी महागाई, पेट्रोल-गॅस दर, बेरोजगारी आणि पत्रकार परिषद न घेण्याच्या विक्रमांवरून उपरोधिक टोला लगावला. मनसे नेते संदीप…

Read More

विषारी दारू प्रकरणात कुणाला वाचवण्याचा प्रयत्न?:रोहित पवारांचा सवाल; पोलिसांना मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान उंचावण्याचे आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पोलिसांना आपला मराठी बाणा दाखवत महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावण्याचे आवाहन केले आहे. पुण्यातील विषारी दारूकांडाचा तपास पुणे पोलिसांच्या मुखियाला जमणार नसल्याचे लक्षात आल्यानेच सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. पण यामागे कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित…

Read More

लखनऊ कोचिंग अग्निकांडावर संतापले सेलेब्स:अग्निहोत्री म्हणाले- मृत्यूचा खेळ, पुढचा नंबर कोणाचा; देवोलीना म्हणाली- हायवे नको, कुटुंबाची सुरक्षा हवी

लखनऊमधील 2 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर अनेक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याच दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या घटनेचा निषेध करत सरकारवर संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य यांनी या अग्नितांडवावर संताप व्यक्त करत लिहिले, ‘सत्ता एक धोकादायक व्यसन आहे. ती चांगल्या हेतू असलेल्या नेत्यांनाही ज्यांची सेवा…

Read More

वाकोद प्रकल्प भूसंपादन:जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश, 20 वर्षांपासून मोबदला थकल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई

फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पासाठी भूसंपादन मोबदला थकल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी बेलीफ, वकील आणि जमीन मालक जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दुपारी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे दालन बंद असल्याने बेलीफने पंचनामा करून प्रशासनाला नोटीस देण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे सुमारे तीन तास प्रशासकीय यंत्रणा आणि…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर संकट आणखी गडद:कशेडी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; 24 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो प्रवासी अडकले

राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून कोकणातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ खवटी परिसरात दगड-मातीचा प्रचंड ढिगारा महामार्गावर कोसळल्याने दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या तब्बल…

Read More

दक्षिण आफ्रिकेच्या माजी राष्ट्रपतींनी हरिद्वारमध्ये पूजा केली:सिद्धपीठातून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत विजयाची कामना केली, पहिल्यांदा उत्तराखंडमध्ये आले

दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जेकब झुमा त्यांच्या भारत दौऱ्यादरम्यान आज हरिद्वारला पोहोचले. दुपारी सुमारे साडेबारा वाजता ते सिद्धपीठ दक्षिण काली मंदिरात पोहोचले, जिथे त्यांनी देवी भगवतीचे दर्शन घेऊन विशेष पूजा-अर्चा केली आणि आगामी निवडणुकांमध्ये आपल्या यशाची कामना केली. मंदिरात पोहोचल्यावर मंदिर प्रशासनाने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. यावेळी त्यांनी पूज्य महामंडलेश्वरांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वादही…

Read More

संघरत्न सरोदे अमरावती जिल्हा परिषदचे नवे शिक्षणाधिकारी:सतीश मुगल यांच्याकडून स्वीकारला पदभार, नांदेडहून बदली

अमरावती जिल्हा परिषदेचे नवे शिक्षणाधिकारी म्हणून संघरत्न सरोदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बुधवारी अमरावतीत पदभार स्वीकारला. सरोदे यांनी प्रभारी शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. सरोदे यांच्या पदभार स्वीकारल्यामुळे मुगल हे आता उपशिक्षणाधिकारी या त्यांच्या मूळ पदावर कायम राहतील. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे अधीक्षक पंकज गुल्हाने…

Read More

‘जगात भारी सायकल वारी’ वारी परिवाराने दिला नारा, 1000 किमी पूर्ण करणाऱ्या सायकलपटूंचा सन्मान‎

पंढरपूर येथे आयोजित पाचव्या अखिल महाराष्ट्र सायकल वारी व रिंगण सोहळ्यात मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबने ‘जगात भारी सायकल वारी’ हा नारा देत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा संगम घडविणाऱ्या या सायकल वारीत राज्यभरातील सुमारे पाच हजार सायकलपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रेल्वे मैदानावर झालेल्या सायकल रिंगण सोहळ्यात सायकलपटू भक्तिरसात तल्लीन झाले….

Read More