Headlines

वेरूळ घाटातील ‘चांगोबा’ वळणावर 2 बसची धडक:अर्धा तास वाहतूक ठप्प, ट्रॅव्हल्सचालक जखमी‎




वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या घाटातील ‘चांगोबा वळणा’जवळ गुरुवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्मार्ट सिटी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ४० भाविक आणि सिटीबसमधील प्रवासी बचावले असून, अपघातात ट्रॅव्हल्सचालक किरकोळ जखमी असून, सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये अडकल्यामुळे ४० ते ४५ फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. कर्नाटकातून ४० भाविकांना घेऊन ट्रॅव्हल्स (एआर ०६ बी ७१८५) वेरूळच्या दिशेने जात होती. त्यावेळी वेरूळकडून खुलताबादच्या दिशेने ५ प्रवासी घेऊन स्मार्ट सिटी बस (एमएच २० इएल २८०७) येत होती. वळणावर दोन्ही बसेस समोरासमोर आल्याने त्यांच्यात धडक झाली. ट्रॅव्हल्सचे चालक संतोष बोरगले (रा. चिकोडी, जि. बेळगाव) हे किरकोळ जखमी झाले. आहेत. घाट वळणांवर संरक्षक कठडे बसविण्याची मागणी दरीच्या काठावर अडकलेली सिटी बस क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढत वाहतूक पूर्ववत केली. वेरूळ लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि दौलताबाद किल्ल्यामुळे या मार्गावर पर्यटकांची वर्दळ असते. या अपघातामुळे घाट रस्त्यावरील वळणांवर मजबूत संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *