मोठा अनर्थ टळला:ठाण्यात भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर बॅनर कोसळले; थरारक VIDEO व्हायरल
सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणारे अनधिकृत आणि बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज नागरिकांच्या जीवावर कसे बेतू शकतात, याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार ठाण्यातून समोर आला आहे. येथील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील तीन हात नाका परिसरात पादचारी पुलावर लावण्यात आलेला एक राजकीय बॅनर थेट चालत्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला. सुदैवाने या थरारक घटनेत दुचाकीस्वार थोडक्यात बचावला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही….