Headlines

नवाजुद्दीन सिद्दीकी मास्क लावून जयपूर विमानतळावरून निघाले:चाहत्यांच्या विनंतीवरून उतारले, फोटो काढले

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी शनिवारी जयपूरला पोहोचले. अभिनेता त्यांच्या आगामी ‘मैं एक्टर नहीं हूं’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगमध्ये सहभागी होणार आहेत. जयपूर विमानतळावर नवाजुद्दीन सिद्दीकी यांना पाहताच चाहत्यांची गर्दी उसळली. विमानतळाबाहेर येताना नवाज काळ्या मास्कमध्ये होते, पण चाहत्यांच्या विनंतीवरून त्यांनी मास्क काढला आणि फोटोही काढले. नवाजुद्दीन म्हणाले – मी जयपूरला येऊन खूप आनंदी आहे. मी…

Read More

पाटबंधारे विभागाकडून जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी काम सुरू:बंद असलेल्या जलविद्युत केंद्रासाठी ६ कोटी रुपये खर्च करून गार्ड वॉल

पैठण तालुक्यातील जायकवाडी धरण पायथ्याशी असलेले जलविद्युत केंद्र मागील तीन वर्षांपासून बंदच आहे, त्याच्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च होत असतानाही केंद्र सुरू होण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. असे असतानाही पिचिंगसाठी ६ कोटी रुपयांची गार्ड वॉल उभारण्यात येत आहे. मात्र जलविद्युत केंद्राची दुरुस्ती होत नसल्याने व कधी होईल याची शाश्वती नसतानादेखील त्याच्या पायथ्याशी पाटबंधारे विभागाच्या वतीने ६ कोटी…

Read More

आमदार चंद्रकांत पाटलांकडून बेशुद्ध बिबट्याला काठीने मारहाण:वन्य प्राण्याला मारणे नियमबाह्य आणि गुन्हा म्हणत एकनाथ खडसेंची टीका

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. वनविभागाने बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केल्यानंतर, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि जमावाने त्याला काठीने अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत असून, यावरून आता राजकीय संघर्ष पेटला आहे. रविवारी…

Read More

मनोज जरांगेंच्या प्रयत्नांना मोठे यश:मराठा आरक्षण आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत, सरकारची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शुक्रवारी मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील 34 मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन छेडले आहे. या प्रकरणी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात तब्बल 309 जणांचा बळी गेला…

Read More

वानवडीत 45 मीटर उंचीचा तिरंगा ध्वज फडकला:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते लोकार्पण

वानवडी येथील संविधान चौकात ४५ मीटर उंचीच्या तिरंगा ध्वजस्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा ध्वज फडकावण्यात आला. माजी महापौर प्रशांत जगताप आणि माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांच्या प्रयत्नातून हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि लष्कर भागाच्या मध्यभागी असलेल्या संविधान चौकात हा ध्वजस्तंभ उभा करण्यात आला आहे….

Read More

थलपती विजयचा शेवटचा चित्रपट जन नायकन पाहण्यासाठी पोहोचली तृषा:बाहेर पडताना गर्दीने वेढले, अभिनेत्रीची आई म्हणाली- वाईट वाटत आहे, त्यांची खूप आठवण येईल

अभिनेते ते राजकारणी बनलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट ‘जन नायकन’ काल म्हणजेच २३ जुलै रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. या निमित्ताने त्यांची कथित गर्लफ्रेंड तृषा कृष्णन फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी पोहोचली होती. थिएटरबाहेर दिसलेल्या तृषाने यावर बोलण्यास नकार दिला, तर तिच्या आईने भावुक होऊन सांगितले की, त्यांना विजयला मोठ्या पडद्यावर पाहण्याची…

Read More

अखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा पूर्ववत:2 ऑगस्टपासून आठवड्यातून चार दिवस मिळणार सेवा, जाणून घ्या वेळापत्रक

महिनाभरापासून बंद पडलेली सोलापूर ते मुंबई ही महत्त्वपूर्ण मानली जाणारी विमानसेवा आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे ‘स्टार एअरलाईन’ कंपनीने २ ऑगस्ट २०२६ पासून ही सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूरच्या व्यापारी, नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्य प्रवाशांना खूप मोठा…

Read More

Ramlala Darbar Corporate Style | Retired IAS to Head Shri Ram Mandir Trust

सचिन मुद्गल/संतोष सिंह. अयोध्या6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या जबाबदाऱ्या आता मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सांभाळतील. ट्रस्टींनी ठरवले आहे की कोणत्याही IAS अधिकाऱ्याला CEO बनवले जाणार नाही. ही जबाबदारी एखाद्या निवृत्त अधिकाऱ्याला सोपवली जाईल. असे का? याचे उत्तर ट्रस्टशी संबंधित एक पदाधिकारी देतात – जर एखादा नोकरशहा CEO बनला, तर मंदिराचे व्यवस्थापन…

Read More

भातकुली पंचायत समितीची इमारत गळकी:सीईओ गांधींना आला अनुभव, नवीन दालनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

भातकुली तालुक्यासाठी अमरावती येथे असलेल्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच बदलणार आहे. ही इमारत फार जुनी झाल्याने मोडकळीस आली आहे. सध्या ती गळकी इमारत म्हणून ओळखली जात असून, पाणी गळण्याचा अनुभव खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनाही आला आहे. यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी…

Read More

हाय प्रोफाइल केसेस हातळणाऱ्या ED अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती!:नीरव मोदी, मेहुल चोक्सीसह नवाब मलिक अन् संजय राऊतांच्या केसचाही केला होता तपास

सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) विशेष संचालक सत्यव्रत कुमार यांनी सेवेची 11 वर्षे शिल्लक असतानाच अचानक स्वेच्छानिवृत्ती जाहीर केल्याने प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या सिलीगुडी येथे कार्यरत असलेल्या सत्यव्रत कुमार यांनी यापूर्वी सुमारे 11 वर्षे मुंबईत सहसंचालक म्हणून काम पाहिले होते. मुंबईतील या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि पंजाब नॅशनल…

Read More