Headlines

राजा शिवाजी चित्रपट करमुक्त करा:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

नुकताच प्रदर्शित झालेला राजा शिवाजी चित्रपट महाराष्ट्रात मनोरंजन करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे. खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केलीय. इतिहासातील अनेक पाने उलगडण्यासाठी चित्रपट हे माध्यम सोयीस्कर असून सर्वसामान्यांना देखील चित्रपट कमी दरात बघता यावा याकरिता हा चित्रपट हे करमुक्त…

Read More

दंड नाही तर थेट हार घालून स्वागत:हेल्मेट सक्तीसाठी अनोखी कारवाई

रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी तिवसा येथील पंचवटी चौकात आरटीओ विभाग व तिवसा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये…

Read More

'बिर्याणीचे 370 रुपये वसूल करेल' म्हणणाऱ्या व्यक्तीची नोकरी गेली:प्रणित मोरेच्या शोची क्लिप व्हायरल झाल्यानंतर कंपनीची कारवाई

22 वर्षीय वेब डेव्हलपर हिमांशू जांगडाला गुरुग्राममधील स्टारविक डिझाइन या कंपनीतून नोकरीवरून काढून टाकण्यात आले. एका व्हायरल व्हिडिओमध्ये त्याने महिलांबद्दल केलेल्या टिप्पणीवर झालेल्या विरोधामुळे ही कारवाई करण्यात आली. हा वाद स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या गुरुग्राममधील लाईव्ह क्राउड-वर्क कॉमेडी शोदरम्यान सुरू झाला. शोमधील संवादादरम्यान, जांगडाने एका डेटिंग अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, त्याने एका महिलेवर सुमारे…

Read More

जपानी मॉडेलने वृद्धांना सांभाळणार केरळम:इमारती व्हीलचेअर अनुकूल बनतील, ‘स्किल बँक’मधून तरुणांना जोडणार

देशातील सर्वात वेगाने वृद्ध होत असलेल्या लोकसंख्येच्या राज्यांपैकी एक असलेल्या केरळमने आता या आव्हानाचा सामना करण्यासाठी जपानचे मॉडेल स्वीकारण्याची तयारी केली आहे. नवीन राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील पहिले समर्पित विभाग आणि ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ‘भारतातील वृद्ध’ अहवाल 2021 नुसार, केरळममध्ये 2011 मध्ये 60 वर्षांवरील लोकांचा वाटा 12.5% होता, जो…

Read More

सोनू मिश्राने निर्मात्यांची कायदेशीर नोटीस फाडली:'काला हिरण' च्या निर्मात्याला म्हणाले- गिधाडांच्या धमक्यांना घाबरणार नाही; मी हनुमानजींचा भक्त

अभिनेता सोनू मिश्रा यांनी ‘काला हिरण’ चित्रपटाच्या निर्मात्यांकडून मिळालेली कायदेशीर नोटीस फाडून टाकली आणि म्हणाले की ते घाबरणार नाहीत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करून सोनू म्हणाला, ‘गेल्या काही दिवसांपासून ‘काला हिरण’ चित्रपटाचा वाद सुरू आहे आणि तुम्ही सर्वांनी माझे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये पाहिले असेल, ऐकले असेल. मी माध्यमांमध्ये सत्य बोललो होतो आणि ते सत्य…

Read More

मिरचीपूड फेकून लुटणारी टोळी जेरबंद:लाडची येथील रस्तालुटीचा 15 दिवसांत उलगडा; हरसूल पोलिसांची कामगिरी‎

महिला बचत गटाचे संकलित पैसे घेऊन जाणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर मिरचीपूड फेकून रोख रक्कम व टॅब लुटणाऱ्या तिघा संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोख रक्कम, टॅबलेट, मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . याबाबत माहिती अशी की, एयू फायनान्स कंपनीचा कर्मचारी…

Read More

पुणे जिल्ह्यात गावोगावी जाऊन गर्भलिंग निदान:रॅकेट पकडले, आरोपीला अटक करून मशीन जप्त, इतरांचा शोध सुरू

पुणे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, डॉक्टसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना केले आहेत. याप्रकरणी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार…

Read More

शासकीय विश्रामगृहातील पार्टीप्रकरणी केली तक्रार:प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी‎

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. असे असतानाच तिवसा येथील साबांविच्या विश्रामगृहात एका राजकिय पक्षाच्या सुमारे दहा ते पंधरा जणांनी पार्टी केल्याचा आरोप आहे. उच्च पदस्थांसाठी आरक्षित असलेल्या व्हीआयपी सूटवर ताबा मिळवला आणि तिथे पार्टी आयोजित केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याप्रकरणात आचारसंहितेचा भंग आणि निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार…

Read More

Nifty Above 23,400 | Pharma Stocks Sell-Off; Sensex Gains

मुंबई12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच बुधवार, १३ मे रोजी सेन्सेक्स १०० अंकांच्या (०.१७%) वाढीसह ७४,७०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही ३० अंकांची (०.१२%) वाढ झाली आहे, तो २३,४०० च्या पातळीवर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे, तर फार्मा शेअर्समध्ये विक्री आहे. आशियाई बाजारात वाढ निर्देशांक पातळी अंकांतील बदल टक्केवारीतील बदल…

Read More

मराठी सक्तीवर प्रताप सरनाईक ठाम:पण अंमलबजावणी लांबणीवर पडण्याचे संकेत; रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी मागितली वर्षाची मुदत

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी आलीच पाहिजे या सरकारच्या भूमिकेचा पुन्हा पुनरुच्चार केला. राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना जुजबी मराठी आलीच पाहिजे. या प्रकरणी त्यांच्या संघटनांनी सरकारकडे 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची मुदत मागितली आहे. या प्रकरणी उद्याच्या आरटीओंच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे ते…

Read More