Headlines

BJP Slams Sanjay Raut on Woman Safety & Hindutva; Calls Him Maharashtra Drohi


फडणवीस हे संविधानानुसार आणि “राष्ट्र प्रथम” या भूमिकेतून काम करणारे नेते असून त्यांनी कधीही आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. काँग्रेससोबत युती करून हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड करणारे संजय राऊतच महाराष्ट्रद्रोही आहेत.पाकिस्तान आणि औरंगजेबाबाबत मवाळ

.

नवनाथ बन म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात भाजपच्या 105 आमदारांना विकासकामांसाठी एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास ठप्प झाला होता. पक्षपाताचा आरोप करणाऱ्या राऊतांनी आधी स्वतःच्या कारभाराचे आत्मपरीक्षण करावे असे म्हणत विकासकामांच्या निधीच्या मुद्द्यावरून राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

राऊतांनी महिला सुरक्षेवर बोलू नये

नवनाथ बन म्हणाले की, एका महिलेविरोधात कथित शिवीगाळ आणि धमक्यांच्या प्रकरणामुळे संजय राऊत यांनी महिला सुरक्षा आणि महिला सन्मानावर बोलू नये. महिलांच्या अधिकारांबाबत भूमिका मांडण्यापूर्वी स्वतःचे आचरण तपासावे. प्रभू श्रीराम आणि रामसेतूच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना आता राम मंदिराचा पुळका आला आहे.मंदिरासंदर्भातील कथित आरोपांची चौकशी सुरू आहे.राम मंदिर आंदोलनाची खिल्ली उडवणाऱ्यांना देशातील रामभक्त कधीही माफ करणार नाहीत, असे म्हणत भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली.

आता रामाची आठवण

खासदारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, राज्यसभेवर निवडून येताना एकनाथ शिंदे आणि तत्कालीन शिवसेनेच्या आमदारांच्या मतांचा आधार मिळाला होता, राऊत यांनी आधी स्वतः राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मग खासदारांच्या राजीनाम्यावर बोलावे. जनतेने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला स्वीकारले असून उगाच राजकीय नाट्य करू नये.

हे ही वृत्त वाचा

फडणवीसांचे वागणे ‘घटनाद्रोही’ अन् ‘रामद्रोही; म्हणूनच ‘ऑपरेशन देवेंद्र’ सुरू झालं:शिंदे गटामुळे फडणवीस महाराष्ट्रात पदावर राहतील की नाही अशी परिस्थिती– संजय राऊत

ओमराजे निंबाळकर हा माणूस सोंगाड्या आहे. त्यांनी खरे बोलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस विरोधात असताना ज्या खासदारांना भेटी देत नाहीत, निधी देत नाहीत पण पक्षांतर करताच त्यांचे कामे मंजूर करतात हा घटनेशी द्रोह आहे हे फडणवीस यांनी लक्षात ठेवावे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे वागणार असतील तर ते घटना द्रोही आणि रामद्रोही आहेत. यामुळेच ऑपरेशन देवेंद्र सुरू झाले आहे, त्यातूनच ते दिल्लीत उच्च पदावर जाणार या चर्चांना पूर्णविराम याच वागणुकीमुळे मिळाला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता देवेंद्र महाराष्ट्रात त्यांच्या पदावर राहतील की नाही असे वातावरण शिंदे गटामुळे निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.