बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, काँग्रेसचा प्रशासनाला इशारा:कंपन्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास 'जोडे मारा' आंदोलन
तिवसा, प्रतिनिधी: तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांमुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीविरोधात तालुका काँग्रेस कमिटीने आज तीव्र आंदोलन केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना इशारा निवेदन सादर करत, संबंधित कंपन्यांवर कारवाई न झाल्यास ‘जोडे मारा’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोगस बियाण्याचे पोते ठेवून आपला तीव्र निषेध नोंदवला. निकृष्ट…