शिवसेनेत येणाऱ्या मविआच्या नेत्यांचे स्वागत:पण कोणतेही 'ऑपरेशन' सुरू नाही, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण; संजय दिना पाटलांवरही भाष्य
पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपणही दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच त्यांनी यापुढे असे वक्तव्य होणार नाही आणि संजय दिना पाटील यांनीही माफी मागितली असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद…