आषाढीत पहिल्यांदाच ‘एअर ॲम्बुलन्स'ची सुविधा:आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतला आढावा, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 3097 डॉक्टरांचे पथक तैनात
प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच यंदा यात्रा काळात आरोग्य विभागाकडून ३ हजार ९७ डॉक्टरांचे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर…