Headlines

इंदापूरमध्ये जय भवानी सोसायटीच्या सचिवला लाच घेताना अटक:नवीन पीक कर्ज मंजूर करण्यासाठी 1000 रुपयांची लाच स्वीकारली

पुणे, प्रतिनिधी: इंदापूर येथील पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव नाना चंद्रकांत बोराटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले. नवीन पीक कर्ज मंजूर केल्याच्या मोबदल्यात त्याने एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात करण्यात आली. नाना चंद्रकांत बोराटे (वय 43, रा. मु. पो….

Read More

खत खरेदीसाठी सातबारा उतारा नव्हे:आता आधार कार्डच राहणार आवश्यक, शेतकऱ्यांची ओळख पटण्यासाठी आता आधार कार्डचा नवा आदेश‎

खतासाठी ७/१२ उतारा अनिवार्य असल्याची अट जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. मात्र खतासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे; जेणेकरून खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांसाठी जारी केलेल्या आदेशातील ७/१२ उतारा हा अनिवार्य केला होता. मात्र ही अट गैरसोयीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी…

Read More

कत्तलीसाठी आणलेल्या 7 गोवंश जनावरांची सुटका:पैठण एमआयडीसी पोलिसांची ढोरकीन शिवारात धडक कारवाई

एमआयडीसी पैठण पोलिसांनी मंगळवारी ढोरकीन शिवारात धडक कारवाई करत कत्तलीसाठी आणून डांबून ठेवण्यात आलेल्या तब्बल सात गोवंश जनावरांची सुटका केली. सुमारे 2 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या या जनावरांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढत एमआयडीसी पैठण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. एमआयडीसी पैठण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पैठण पोलिस…

Read More

पालखी सोहळ्यात भाविकांचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास:पुणे, मांजरी, हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाविकांकडून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही पुणे-सोलापूर रस्ता, भवानी पेठ आणि हडपसर परिसरात या घटना घडल्या. याप्रकरणी समर्थ, मांजरी आणि हडपसर पोलीस ठाण्यांमध्ये चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री…

Read More

ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही:उबाठात लवकरच स्फोट होणार, आमदार, खासदार, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात- संजय शिरसाट

ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील त्यावेळेसच आपल्याला कळेल. कोणतेही ऑपरेशन करताना ते काही बँडबाजा लावून केले जात नाही. आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत जे रोज एकनाथ शिंदेंना सांगत असतात पण योग्य वेळी निर्णय घेणं ही शिंदेंची ख्याती आहे, असे शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे….

Read More

चांदी ₹2,046 ने घसरून ₹2.32 किलोवर आली:सोनंही ₹832 स्वस्त, ₹1.46 लाखांना 10 ग्रॅम; कॅरेटनुसार किंमत पाहा

सोन्या-चांदीच्या दरात आज 6 जुलै रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 832 रुपयांनी घसरून 1.46 लाख रुपयांवर आले आहे. तर, एक किलो चांदी 2,046 रुपयांनी घसरून 2.32 लाख रुपयांवर आली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 6 जुलै 2026 यावर्षी…

Read More

पेद्दीमधून हटवले जान्हवी कपूरचे वादग्रस्त सीन:दिग्दर्शकाने मान्य केले- काही सीन दिशाभूल करणारे होते; जान्हवीला बोल्ड दाखवल्याने वाद सुरू झाला

साउथ स्टार राम चरण आणि जान्हवी कपूरचा चित्रपट ‘पेद्दी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे, पण चित्रपटात जान्हवीच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याने वाद निर्माण झाला होता. प्रेक्षकांच्या विरोधामुळे, चित्रपटाचे दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी पुष्टी केली आहे की चित्रपटातून सर्व वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले की…

Read More

नीट घोटाळ्यामुळे ४ विद्यार्थ्यांची आत्महत्या:पालकांचे संसार उद्ध्वस्त, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – राजू शेट्टी

नीट परीक्षा घोटाळ्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घोटाळ्यामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून आतापर्यंत चारहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, खासदार राजू शेट्टी यांनी या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकारी, दलाल आणि संस्थाचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांनी म्हटले आहे की, या आत्महत्या नसून सरकारी अनास्थेने केलेल्या हत्या आहेत….

Read More

अभिषेक बॅनर्जींच्या घरी पोहोचले पोलिस:नगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम नोटिसीनंतर कारवाई; अभिषेक यांनी 14 दिवसांची मुदत मागितली

अवैध बांधकाम प्रकरणी सोमवारी कोलकाता पोलिसांचे एक विशेष पथक टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या हरीश मुखर्जी रोडवरील ‘शांतिनिकेतन’ या घरी पोहोचले. कोलकाता महानगरपालिकेच्या (केएमसी) नोटिसीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध भाग पाडण्याचे आदेशही जारी करण्यात आले आहेत. नोटिसीच्या अनुषंगाने कोलकाता पोलिसांनी तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कोलकाता महानगरपालिकेच्या नोटिसीला उत्तर देताना अभिषेक…

Read More

पैठणमध्ये महेश नवमी उत्साहात साजरी‎:पर्यावरणपूरक ईव्ही बाइक रॅलीचे मुख्य आकर्षण, आतषबाजीत भगवान महेश यांची शोभायात्रा

येथे माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त धार्मिक विधी, विविध स्पर्धा, समाजभूषणांचा गौरव आणि भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण लक्षात घेता यंदा प्रथमच काढण्यात आलेली पर्यावरणपूरक ईव्ही (इलेक्ट्रिक) बाईक रॅली हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. सकाळी बालाजी मंदिर आणि हरिहरेश्वर मंदिर येथे मंत्रघोषात भगवान महेश यांच्या मूर्तीचा…

Read More