Headlines

बालभारतीच्या अभ्यासक्रमावरून पुन्हा नवा वाद:सहावीच्या मराठी पुस्तकातून महाराष्ट्राचीच लोकनृत्ये गायब; केवळ परराज्यांतील नृत्यांना स्थान

राज्यात एका बाजूला शालेय शिक्षणात ‘सीबीएसई’ पॅटर्न राबवण्यावर आणि मराठी भाषा सक्तीची करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या संदर्भात सातत्याने त्रुटी समोर येत आहेत. आता बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका धड्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. या पुस्तकातील ‘लोकनृत्य’ या पाठात महाराष्ट्रातील समृद्ध लोककलांना डावलून…

Read More

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती:मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मोठे यश

राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर राज्याचे मुख्य माहिती आयुक्तांनी 12 जून रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे…

Read More

बीड भूसंपादन घोटाळा:बदलीनंतरही काढले बॅकडेटचे आदेश; 241 कोटींच्या गैरव्यवहारातील अतिरिक्त रक्कम वसूल होणार

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52च्या भूसंपादन प्रकरणातील तब्बल 241 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यावर राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी (लवाद) यांनी बदली झाल्यानंतरही मागील तारखांनी आदेश काढून भूसंपादनाची रक्कम वाढवल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच वितरित झालेली अतिरिक्त…

Read More

माऊलींच्या पालखी रथाला हिंगोलीचा साज:बैलजोडी आळंदीत सजणार, वारकरी सोहळ्याची जय्यत तयारी

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आळंदी येथील पालखी रथाची बैलजोडी हिंगोलीच्या साजाने सजणार असून या बैलजोडीसाठी आवश्‍यक असलेला साज आळंदी येथे संस्थानकडे सूपुर्द करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातून पालखी सोहळे विट्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जातात. लाखो वारकरी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन तृप्त होता. हरिनामाचा गजर करीत निघालेल्या पालखी सोहळा, दिंडी यामुळे संपूर्ण वातावरण…

Read More

ओप्पो रेनो 16 स्मार्टफोन सिरीज भारतात लॉन्च:50 मेगापिक्सेल टेलीफोटो कॅमेऱ्यासह 7000mAh बॅटरी, सुरुवातीची किंमत ₹46,999

ओप्पो ने आज भारतात नवीन स्मार्टफोन सिरीज रेनो 16 लॉन्च केली आहे. यात कंपनीने रेनो 16 आणि रेनो 16C सादर केले आहेत. दोन्ही मोबाईल स्टायलिश लुक, 50 मेगापिक्सल टेलीफोटो आणि 50MP अल्ट्रा वाइड सेल्फी कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसरसह प्रीमियम मिड रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. ओप्पो रेनो 16C तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात…

Read More

निर्भीड लेखणी हरपली:ज्येष्ठ पत्रकार टी. बी. गोल्हर यांचे निधन; नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपद म्हणून मोठे योगदान

ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भगवंत गोल्हर यांचे गुरुवारी, २ जुलै रोजी पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा (धनज) येथील रहिवासी असलेल्या तुळशीदास गोल्हर यांनी अनेक दशके पत्रकारितेत सक्रिय होते. त्यांनी…

Read More

पाकिस्तानात पाडलेल्या गुरुद्वाराची पुनर्बांधणी होणार:प्रांतीय मंत्र्याने अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला; जमिनीच्या मालकी हक्काची चौकशी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका 125 वर्षांच्या जुन्या ऐतिहासिक गुरुद्वाराला अधिकृत परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे पाडल्याच्या प्रकरणामुळे शीख समुदायात तीव्र संताप आहे. विरोध प्रदर्शनंतर प्रांतीय सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे. सरकारने ऐतिहासिक ‘गुरुद्वारा सिंह सभा’ त्वरित पुन्हा बांधण्याचा (पुनर्निर्माण करण्याचा) आदेश जारी केला आहे, तसेच जमिनीच्या मालकी हक्काची कायदेशीर चौकशी सुरू केली आहे. हे संपूर्ण प्रकरण लाहोरपासून…

Read More

सीईओ पाटील यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी:आषाढीवारीच्या तयारीचा घेतला आढावा, समन्वयाने काम करण्याच्या सूचना

आषाढीवारीच्या तयारीच्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण, सुरक्षितता आणि मुलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्व संबंधित विभागाने परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे, अशा सूचना पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक…

Read More

मुंबईत 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू:फोनवर बोलत चालली होती व्यक्ती, दुसऱ्या मॅनहोलमध्ये सापडला मृतदेह, पालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप

मुंबईत एकीकडे पावसाने हाहाकार उडवला असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे निष्पाप मुंबईकरांचे बळी जात आहेत. कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर चहुबाजूंनी संताप व्यक्त…

Read More

नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा' चित्रपटाचा टीझर रिलीज:1 जानेवारीला उलगडणार भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोची गोष्ट

स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एका भव्य कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सच्या बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा दमदार टीझर आज सोशल मीडियावर…

Read More