निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक?:संजय शिरसाटांचा थेट आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र; आज न्यायालयात हजर करण्यात येणार
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भाष्य करत गंभीर आरोप…