Headlines

होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या- मा.आ. स्नेहलता कोल्हे

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे की, श्रीक्षेत्र पुणतांबा हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होत असल्याने…

Read More

स्वारगेटमध्ये खुनाचा प्रयत्न:वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत

स्वारगेट परिसरात एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा हा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुनी याच्याविरुद्ध स्वारगेट…

Read More

हिंगोलीकरांचा प्रवास होणार प्रदूषणमुक्त:आगारात 21 पैकी 4 ‘ई-शिवाई' बस दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उदघाटन, होणार आरामदायी प्रवास

हिंगोली आगारासाठी मंजूर झालेल्या २१ ई शिवाई बसपैकी चार बसेस दाखल झाल्या असून सोमवारी ता. १ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते याबसेसच उदघाटन करण्यात आले. लांबपल्याच्या मार्गावर या बसेस धावणार असून याबसेस मुळे हिंगोलीकरांचा प्रवास आता आणखी आरामदायी व प्रदुषणमुक्त होणार आहे. राज्यात महामंडळाने पर्यावरण पुरक बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आगाराच्या मागणी नुसार…

Read More

अदानी एंटरप्रायझेसला चौथ्या तिमाहीत ₹221 कोटींचा तोटा:वार्षिक महसूल 20% वाढला; कंपनी प्रत्येक शेअरवर ₹1.30 लाभांश देईल

अदानी एंटरप्रायझेसने 30 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या तिमाहीत कंपनीला ₹221 कोटींचा निव्वळ तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ₹3,845 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. तथापि, कंपनीचा महसूल 20% नी वाढून ₹32,439 कोटींवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या तिमाहीत ₹26,965 कोटी होता. निकालांसोबतच, अदानी एंटरप्रायझेसच्या बोर्डाने…

Read More

लाच स्वीकारताना वैजापूर येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसीबीच्या जाळ्यात:पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी घेतली 1 हजाराची लाच‎

वैजापूर पंचायत समिती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रभारी गटविकास अधिकारी, प्रशासकीय कारभारावरील प्रश्न, बैठकींतील गोंधळ आणि कामांमध्ये टक्केवारीच्या चर्चांमुळे आधीच टीकेचे धनी ठरलेल्या पंचायत समितीवर आता भ्रष्टाचाराचा आणखी एक डाग लागला आहे. सोमवारी (२९ जून) पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थीला दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी जिओ-टॅगिंग व फोटो अपलोड करण्याच्या कामाच्या मोबदल्यात अवघ्या १ हजारांची…

Read More

जावरा ते वरुडा मार्गाची दुरवस्था; काँग्रेस आक्रमक:10 दिवसांत बांधकाम सुरू न झाल्यास आंदोलन‎

तालुक्यातील जावरा फाटा ते वरुडा या ग्रामीण मार्ग क्र. तीनची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज वानखडे यांना निवेदन दिले . दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने…

Read More

पुढचा विकास तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानेच करावा लागेल:मंत्री जयकुमार गोरेंचा खासदार विशाल पाटलांवर पलटवार

मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून सांगली जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार राडा सुरू झाला आहे. शासकीय कार्यक्रम होण्यापूर्वीच, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि खासदार विशाल पाटील यांनी या इमारतीचे ‘अनधिकृत’ उद्घाटन उरकून घेतले. या कार्यक्रमात बोलताना विशाल पाटील यांनी, “शासकीय निधी म्हणजे सत्ताधाऱ्यांना आपल्या बापाचा पैसा वाटतो,” अशी तिखट टीका केली होती. या टीकेला…

Read More

शेतकऱ्यांना सिंचन अनुदानासाठी स्वहिस्सा देण्याची गरज नाही:'सेंट्रल बँक डिजिटल चलन' प्रणालीद्वारे थेट वितरण, लाभ घेणे सोपे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (टप्पा-२) राज्यातील ७ हजार २०१ गावांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि सर्व महिला शेतकऱ्यांना आता ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान थेट ‘सेंट्रल बँक डिजिटल चलन’ (सीबीडीसी) या डिजिटल प्रणालीद्वारे वितरित केले जाईल. या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना सिंचन संच खरेदीसाठी आपला स्वहिस्सा आधीच जमा करण्याची गरज राहणार नाही, ज्यामुळे त्यांना मोठा…

Read More

कांदा प्रश्नावर 10 दिवसांत तोडगा निघणार:अमित शहांसोबत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांची माहिती; निर्यातबंदीही उठणार!

महाविकास आघाडीकडून तसेच इतर विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासंदर्भात सत्ताधाऱ्यांविरोधात मोठे आंदोलन केले होते. महाविकास आघाडीकडून काल (दि. 26 मे) नाशिक येथे रस्ता जाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाने दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या…

Read More

रामोजी फिल्म सिटीत राजेश शर्मांना किडा चावला:अभिनेते रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले- धोक्याबाहेर नाही, प्रभासच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते

बॉलिवूड अभिनेते राजेश शर्मा यांना पायाला संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये अभिनेता प्रभासच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांना एखाद्या विषारी किड्याने किंवा कोळ्याने चावा घेतला होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे ते डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. त्यांच्या सह-कलाकार सुदीपा चटर्जी यांनी सोशल मीडियावर…

Read More