Headlines

मुंबईच्या लोकलसह अणुऊर्जा केंद्र उडवण्याचा कट उधळला:मुंब्रा, कुर्ला व पुण्यातील 8 दहशतवाद्यांना बेड्या




मुंबई, पुणे आणि पंजाबमध्ये रक्तपात घडवण्याचा पाकिस्तानचा भीषण कट पोलिसांनी हाणून पाडला. दाऊद इब्राहिमचा कुख्यात हस्तक मुन्ना झिंगडा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱ्यावर स्फोट घडवण्यासाठी सज्ज असलेल्या तब्बल आठ दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने अटक केली आहे. या कारवाईत मुंबईतील मुंब्रा व कुर्ला आणि पुण्यातील एका दहशतवाद्याचा समावेश असून, त्यांनी मुंबईची ‘लाइफलाइन’ असलेल्या दादर रेल्वेस्थानकासह संवेदनशील अशा अणुऊर्जा केंद्राची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या आंतरराज्य दहशतवादी नेटवर्कचा मुळापासून पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानात बसलेला मुन्ना झिंगडा आणि आयएसआयचा हँडलर शहजाद भट्टी यांच्याकडून या दहशतवाद्यांना थेट आदेश मिळत होते. या कारवाईत महाराष्ट्रातून मुंब्रा येथील तौकीर रिझवान अहमद शेख, कुर्ल्यातील साजिद मेहबूब शेख (अरबाज खान) व पुण्यातून विजय ऊर्फ शूटर अशा तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पाक बनावटीचे ४ हँड ग्रेनेड व ग्लॉक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. हे स्फोटक साहित्य घेऊन ते मुंबई आणि दिल्लीत मोठा विध्वंस घडवण्याच्या तयारीत होते. दिल्लीतून नेपाळच्या ‘अंग कामी लामा’ यालाही बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईला अंधारात लोटायचे होते दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरण्यासाठी संवेदनशील ठिकाणांची रेकी केली होती. त्याचे व्हिडिओ दिल्ली पोलिसांच्या हाती लागले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *