![]()
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १८ जणांचा बळी घेणाऱ्या विषारी दारू प्रकरणात थेट भिवंडी कनेक्शन समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार भिवंडी येथील ‘मे. रेक्स इंटरनॅशनल’ कंपनीच्या गोदामावर छापा टाकून तब्बल ५,९२
.
फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसरात ३० रुपयांत मिळणारी घातक गावठी दारू पिण्यामुळे १८ लोकांचा बळी गेला. तपासात दारूत अत्यंत घातक ‘मिथेनॉल’ मिसळल्याचे समोर आले. कर्नलसिंग विरका (फुगेवाडी) यांनी योगेश वानखेडेकडून दारू घेतली होती. योगेशने ती उरुळी कांचन येथील राजूप्रजापतीकडून आणली होती. राजूने हा विषारी साठा थेट भिवंडीतील रेक्स इंटरनॅशनलकडून मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी ८ तस्करांना अटक केली असून सीआयडी तपासात या रॅकेटची पाळेमुळे समोर येण्याची शक्यता आहे. मालक ताब्यात, कंपनीचा परवाना रद्द होणार पॉयझन्स ॲक्ट अंतर्गत खरेदी-विक्रीची नोंदवही सादर करण्यास कंपनी अपयशी ठरल्याने गोदाम तात्काळ सील केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मालक अरुण कुमार चौबे आणि अभिषेक आसन कुमार चौबे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच, एफडीएने परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसही बजावली.
अधिक नशेसाठी दारूत विषारी मिथेनॉलचा वापर
औद्योगिक वापराचे मिथेनॉल अत्यंत विषारी असते. उत्पादन खर्च कमी करून नशा वाढवण्यासाठी अवैध दारू माफिया याचा वापर करतात. मानवी शरीरात मिथेनॉलचे रुपांतर घातक फॉर्मिक ॲसिडमध्ये होते. यामुळे थेट मज्जासंस्थेवर परिणाम होऊन अंधत्व येते आणि अवयव निकामी होऊन मृत्यू होतो.
९ पोलिसांसह २२ अधिकाऱ्यांचे निलंबन
अवैध दारू विक्री रोखण्यात अपयशी ठरल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ९ पोलिस अधिकारी (हडपसर आणि दापोडी चौकी) आणि उत्पादन शुल्क विभागाच्या १३ अशा एकूण २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.