Headlines

कौंदर येथील सप्ताहाची काल्याने सांगता:नवले महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले

प्रतिनिधी | दावरवाडी “भक्ताच्या अंतःकरणात जर दृढ विश्वासाचे आणि भक्तीचे बळ असेल, तर त्याची बुद्धी विचलित न होता स्थिर होते. हीच स्थिर बुद्धी माणसाला हरीच्या चरणी लीन करते. ज्याच्या हृदयात ईश्वरी नामाचा प्रकाश आहे, त्याला संपूर्ण चराचरात ईश्वराचेच रूप दिसते,’ असे प्रतिपादन कीर्तनकार कृष्णा महाराज नवले यांनी केले. पैठण तालुक्यातील कौंदर येथे शन्नैश्वर जयंतीनिमित्त आयोजित…

Read More

जिल्हा सहकारी बँकेत निवडून आलेले 3नवे संचालक भाजपच्या तंबूत दाखल:अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदेसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरू

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकल्या असून उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनीही महायुतीच्या पॅनलमधून विजय संपादन केला. २० पैकी १९ सदस्य महायुती पॅनलचे असल्याने बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीचे होणार यात दुमत नाही. अध्यक्षपदी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला ३ सदस्य आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि अपक्ष…

Read More

समाजात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण:संजीवनीचे माजी विद्यार्थी हेच या संस्कारांचे जिवंत उदाहरण- आमदार विवेक कोल्हे

प्रतिनिधी |कोपरगाव इंजिनिअर चुकला तर त्याचे बांधकाम बाधित होईल, डॉक्टर चुकला तर रुग्ण दगावू शकतो; पण जर शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. म्हणूनच समाजात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण आहे. संजीवनीचे शिक्षक खऱ्या अर्थाने उत्तम काम करत असून आज जगभरात यशस्वी असलेले संजीवनीचे माजी विद्यार्थी हेच या संस्कारांचे जिवंत उदाहरण आहेत, असे प्रतिपादन…

Read More

अहिल्यानगर-पुणे “इंटरसिटी’चे सहा अडथळे पार:आता “हडपसर जंक्शन’चा सातवा खोडा, इंटरसिटीने प्रवास होणार होता अवघ्या 3 तासांत, रस्ते मार्गानेही लागतो वेळ‎

अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे स्वप्न असलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळा झालेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन खोडा घातला आहे. “हडपसर जंक्शन’ पूर्ण झाल्याशिवाय नगर-पुणे इंट . पूर्वी सोलापूर विभागात असलेले अहिल्यानगर दोन वर्षांपूर्वी पुणे विभागात समाविष्ट झाले, मात्र दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेबाबत कमालीची उदासीनता दाखवली…

Read More

पुणे बाल पुस्तक जत्रा महाराष्ट्रासाठी रोल मॉडेल:वाचन संस्कृती जपण्यासाठी असे उपक्रम गरजेचे – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

पुणे बाल पुस्तक जत्रेसारखे उपक्रम मुला-मुलींमध्ये वाचनाची आवड रुजवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यातून वाचन संस्कार जपण्याचे मोलाचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेला रवींद्र चव्हाण यांनी…

Read More

There will be a break in the rains after the 10th in July, with cyclonic winds blowing, there will be satisfactory rain everywhere in the first week.

बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वद . यंदा अल निनो च्या प्रभावामुळे अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात ज्या प्रमाणात कमी…

Read More

सचिन अहिर एकदम सेफ:एकटे आमदार पक्ष सोडून जाऊनही अपात्रतेची कारवाई होणार नाही, जाणून घ्या कायदेशीर बाजू

ठाकरे कुटुंबाचे अत्यंत विश्वासून आणि निष्ठावान नेते मानले जाणारे सचिन अहिर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर सचिन अहिर यांना थेट विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी विराजमान केले जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. एकीकडे ठाकरे गटाने या बंडखोरीवर संताप व्यक्त करत अहिर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते सचिन…

Read More

भुकेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा:समाधान महाराज शर्मा यांचे प्रतिपादन, गंगापूर येथील श्रीराम कथा‎

प्रतिनिधी | गंगापूर देवाने सर्व दु:खे द्यावीक, परंतु दरिद्रीसारखं दु:ख कोणाला देऊ नये. भुकेल्यांना अन्न व तहानलेल्यांना पाणी देण्यासाठी आपापल्या परीने प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन समाधान महाराज शर्मा यांनी केले. सत्संगाच्या माध्यमातून भाविकांमध्ये आत्मसाक्षात्कार, ईश्वरभक्ती आणी जीवनात सुधारणा घडवून आणणे या उद्देशासाठी रामकथेचे आयोजन करण्यात आले असून त्यादृष्टीने भाविकांनी कथेचे स्रवण करावे, असे मतही…

Read More

सिंचनासाठी पाणी घेणाऱ्या एक हजार शेतकऱ्यांच्या उपशाला आजपासून ब्रेक:ऑगस्ट अखेरपर्यंत सिंचन योजनांची वीज तोडणार

एल निनो इफेक्टमुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर जूनमध्ये धडक देणाऱ्या मान्सूनच्या पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टअखेरपर्यंत पिण्याचे पाणी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुळा धरणातून सुरू असलेले कालव्याद्वारे सिंचनाचे आवर्तन तत्काळ थांबवण्यात आले. आता धरणावरील उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा सोमवारपासून (१५ जून) खंडित करण्यात येणार आहे. धरणावर सुमारे १ हजार शेतकऱ्यांच्या…

Read More

बिल मंजुरीसाठी कमिशनखोरीचा भंडाफोड:6 टक्क्यांच्या ‘कट’चा खेळ उघड! बदलापूर नगर परिषदेत ACB ची कारवाई

बदलापूरमध्ये नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या बिलांसाठी आणि सुरक्षा ठेवीच्या रकमेवर 6 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची…

Read More