नवीन मक्याला दोन हजारांचा भाव; 43 अंश तापमानातही काढणी सुरू:मजूर मिळत नसल्याने यांत्रिकीकरणाकडे शेतकऱ्यांचा कल
एकीकडे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून उष्माघाताच्या घटना समोर येत आहेत. मात्र दुसरीकडे सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ आणि परिसरातील ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर ४३ अंश सेल्सिअस तापमानातही जीवाची पर्वा न करता शेतात राबताना दिसत आहेत. सध्या परिसरात मका काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असून कडक उन्हातही…