Headlines

ममता बॅनर्जींचा हरल्या नाहीत, केंद्राने त्यांना दहशतीने रोखले:संजय राऊत यांचा आरोप; हिंदीला विरोध नाही, पण मराठी राज्याची प्रथम भाषा

आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सरकारमधील काही लोकांना लोकशाहीचे हे पतन मान्य नाही. सरकारच्या हुकुमशाहीविरोधात आघाडीने एकत्र येणं गरजेचे आहे. जसे इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला…

Read More

अशोक खरातचा नवा घोटाळा उघड:32 बनावट खात्यांतून 57 लाखांची अफरातफर; भोंदूगिरीतून खरातचा आणखी एक मोठा पर्दाफाश

नाशिक जिल्ह्यात स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवणाऱ्या अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आधीच विविध गंभीर आरोपांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत एका व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून 32 बनावट खाती उघडण्यात आल्याचे उघड झाले आहे. या खात्यांच्या माध्यमातून…

Read More

संत तुकोबांच्या पालखीचे 7 जुलैला पंढरीकडे प्रस्थान:पायी वारीचे वेळापत्रक जाहीर, देहूत जय्यत तयारी; यंदा 25 जुलैला आषाढी एकादशी

मान्सूनच्या पहिल्या सरी बरसल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला ओढ लागते ती पंढरीच्या पांडुरंगाची आणि आषाढी वारीची. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ म्हणत विठ्ठल नामाचा जयघोष करत लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या विठ्ठल भेटीसाठी आतुर झाले आहेत. यंदा २५ जुलै २०२६ रोजी आषाढी एकादशी असल्याने वारीचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३४१…

Read More

जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले:अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन काढला काटा, तिघांना अटक

सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले असून लोणार तालुक्यातील वढव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने २५ हजार रुपयांमध्ये सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना शुक्रवारी ता. १० अटक केली आहे. सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील नाल्यात दोन…

Read More

औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट!:266 कोटींच्या विकास आराखड्याला सोमवारी मिळणार मंजुरी

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे विविध विकास कामांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी ता. ११ पालक सचिव रिचा बागला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. देशातील…

Read More

मोठी दुर्घटना! पुण्यात दोन मजली इमारत कोसळली:14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य युद्धपातळीवर

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मोशी कचरा डेपो परिसरातील दोन मजली इमारत अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत सुमारे 10 ते 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोशी कचरा डेपोजवळील दोन मजली इमारत…

Read More

पंढरपूरच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना:जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढवला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य तीन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. नेमका अपघात कसा झाला?…

Read More

पठाणकोट-गुरुदासपूर महामार्गावर बस उलटली, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू:पेपर देऊन जम्मूला परतत होते, मागे येणारी वाहनेही धडकली; 5 जखमी

गुरुदासपूर-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी धारीवालजवळ भरधाव वेगाची टूरिस्ट बस अनियंत्रित होऊन उलटली. बस अमृतसरहून जम्मूच्या दिशेने जात होती आणि त्यात बहुतेक कॉलेजचे विद्यार्थी होते. ती उलटताच तिच्या मागे असलेल्या 3 ते 4 गाड्याही एकमेकांवर आदळल्या. या अपघातात 2 कॉलेज विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व कॉलेज…

Read More

हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यात मोठा निर्णय:16.85 लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी 3 महिन्यांचे धान्य

हवामानातील बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील १६.८५ लाख रेशनकार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. हा एकत्रित धान्यपुरवठा एप्रिल ते जून या तीन महिन्यांसाठी असेल. लाभार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार ३० जूनपर्यंत या धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात अंत्योदय…

Read More

खराडीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून:पतीने धारदार शस्त्राने वार करत जीव घेतला, आरोपी फरार

पुणे शहरातील खराडी भागात कौटुंबिक वादातून एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपास पथक रवाना केले आहे. किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून…

Read More