Headlines

देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याला विरोध:भीमाशंकर, अष्टविनायक मंदिरांसह शेकडो देवस्थानांचे रणशिंग

भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान आणि अष्टविनायक समितीसह पुणे पंचक्रोशीतील शेकडो प्रमुख देवस्थानांनी ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन (प्रारूप) अधिनियम, २०२६’ या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. देवस्थानांच्या जमिनी वाचल्या तरच मंदिरे आणि धर्मकार्य सुरक्षित राहील, असे सांगत सरकारने जमिनी अधिग्रहित करण्याचे काम तात्काळ थांबवावे, असा इशारा या देवस्थानांनी दिला आहे. मंदिर महासंघाच्या वतीने पुण्यात या कायद्याविरोधात महत्त्वपूर्ण…

Read More

पावसाळ्यात 46% कचरा नद्यांद्वारे समुद्रात; धोका वाढला:FSIने 'कॅचमेंट-टू-कोस्ट' धोरण जाहीर केले, महाराष्ट्राचे किनारे 'अति-घाण'

वैज्ञानिक आकडेवारीनुसार, भारतातील मान्सून (पावसाळा) हा समुद्रातील प्लास्टिक आणि कचरा वाढवणारा सर्वात मोठा घटक ठरत आहे. पावसाळ्यातील पूर आणि मुसळधार पावसामुळे शहरांमधील कचरा नद्यांद्वारे थेट समुद्रात वाहून जातो, ज्यामुळे सागरी प्रदूषणात लक्षणीय वाढ होते. देशातील एकूण वार्षिक सागरी कचऱ्यापैकी तब्बल ४६% कचरा हा केवळ पावसाळ्यात नद्या आणि सागरी किनाऱ्यांवरील ८० चिन्हांकित मार्गांद्वारे समुद्रात पोहोचतो. गंगा-ब्रह्मपुत्रा…

Read More

घाटनांद्र्यात अंगणवाडीजवळ घाणीचे साम्राज्य; बालकांचे आरोग्य धोक्यात:शनिवारी दिवसभर रिमझिम पाऊस; नगरखाना परिसरात साचले पाणी‎

परिसरात शनिवारी सकाळपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे गावातील अंगणवाडी परिसराला घाणीच्या आणि दुर्गंधीच्या साम्राज्याने वेढले असून, लहान बालकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा रस्ता प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा आणि लहान मुलांच्या अंगणवाडीचा मार्ग आहे. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे या घाणीचा चिखल झाला असून सर्वत्र तीव्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावर पाणी तुंबणे…

Read More

सिलिंडर मिळण्याआधी डिलिव्हरीचा संदेश:गॅस एजन्सींचा अजब कारभार, साठा दुप्पट तरीही तुटवडा का? विभागाची आकडेवारी कागदावरच‎

अमेरिका आणि इस्रायलने इराणशी पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही रांगेत उभे राहूनच सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे. . कमी-अधिक प्रमाणात भारत, इन्डेन आणि एचपी या तिन्ही प्रकारच्या गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोरचे हे चित्र आहे. संबंधित प्रतिनिधीने आज, गुरुवारी, सकाळच्या सत्रात काही वितरकांच्या…

Read More

जनरल एन.एस. राजा सुब्रमणी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले:गुलवीर 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेत 1.6 किमीची शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय, 1 जूनच्या चालू घडामोडी

आजच्याप्रमुख चालू घडामोडी, सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल एन.एस. राजा सुब्रमणी CDS म्हणून नियुक्त झाले 2. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन देशाचे 27 वे चीफ नेव्हल स्टाफ बनले 3. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्यानमारच्या राष्ट्रपतींची भेट घेतली क्रीडा (SPORTS) 4. ॲथलीट गुलवीर सिंगने 4 मिनिटांत शर्यत पूर्ण केली 5….

Read More

BJP Vs Rahul Gandhi Foreign Trips Funding; Sambit Patra Congress

Marathi News National BJP Vs Rahul Gandhi Foreign Trips Funding; Sambit Patra Congress | Political News नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते आणि खासदार संबित पात्रा म्हणाले- राहुल गांधींनी गेल्या 22 वर्षांत 54 परदेश दौरे…

Read More

Maharashtra Vidhan Parishad Deputy Speaker Election 2026; Neelam Gorhe vs New Face

महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या उपसभापती पदासाठी येत्या 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषदेत याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली असून, महायुतीकडे (विशेषतः शिंदे गटाकडे) हे पद जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या प . निवडणुकीचा कार्यक्रम आणि नियम अर्ज दाखल करण्याची मुदत: 30 जून 2026 रोजी दुपारी 12…

Read More

बोव्हाईन ब्रिडींग ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करा:पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचे निर्देश; अनधिकृत संस्थांना नोंदणीचे आवाहन

राज्यातील गाई-म्हशींच्या जातींमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि प्रजनन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, 2023’ (बोव्हाईन ब्रिडींग ऍक्ट) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. अनेक खाजगी कृत्रिम रेतन सेवादाते आणि संस्थांनी अद्याप नोंदणी केली नसल्याचे समोर आले असून, अशांवर कठोर कारवाई केली जाईल, असा…

Read More

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का?:युद्धाचे कारण पुढे करून इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला मुदतवाढ -विजय वडेट्टीवार

आखातातील युद्धामुळे मुंबईतील इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत सरकार महामानवांच्या विचारांप्रती अनास्था का बाळगत आहे? असा सवाल केला आहे. आखात इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तांबे व स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला…

Read More

माढा तालुक्यातील 7 शेतकऱ्यांचा गौरव:खरीप हंगाम 2025 मधील विजेत्यांना सन्मानचिन्ह‎

कुर्डुवाडी पंचायत समिती कृषी विभाग व माढा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष सोहळ्यात तालुक्यातील विविध पिकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कुर्डुवाडी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या…

Read More