![]()
तालुक्यात एका गावातील अंगणवाडी सेविकेस मारहाण व विनयभंग झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवारी वैजापूर शहरातील पंचायत समितीसमोर अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. प्रवीण डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरे, बाळू काशिनाथ डोंगरे व रवींद्र डोंगरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही सेविकांनी दिला. आयटकच्या सचिव शालिनी पगारे यांनी पीडितेला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. बीडीओ यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अरुण नवले पाटील, अजय साळुंके यांच्यासह अनेकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. आता कारवाईशिवाय माघार नाही : अंगणवाडी सेविकेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी वैजापूर पंचायत समितीसमोर अंगणवाडी सेविकांनी चार तास आंदोलन केले. निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आरोपींवर ठोस कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
Source link
अंगणवाडी सेविकांचे वैजापूरमध्ये आंदोलन:जळगाव येथील सेविकेच्या विनयभंग प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी