Headlines

वृक्ष लागवडच नव्हे तर संगोपनाचा संकल्प करा:विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण‎




जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ५ रोजी विद्यापीठ परिसरात रस्त्याच्या दुतर्फा निंबाच्या झाडांचे ३० रोपटे लावले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले . याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी विद्यार्थ्यांना संदेश देताना वृक्षलागवडच नव्हे तर वृक्ष संगोपनाचा संकल्प करा, असे आवाहन केले. विद्यापीठ परिसरात सद्यःस्थितीत सुमारे पाच लाख वृक्ष आहेत. तर विद्यापीठाच्या उद्यान विभागाच्या वतीने पावसाळ्यात एक हजार वृक्षांची लागवड करणार असून विद्यापीठ परिसरात सीड्स बॉल विद्यार्थ्यांच्या माध्यमातून टाकणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ. ढोरे विद्यार्थ्यांना संदेश देताना म्हणाले, तरुण पिढी म्हणून तुमच्याकडे ऊर्जा नवीन विचार आहेत, जे या पृथ्वीला सुंदर बनवू शकतात. पर्यावरण रक्षणाची सुरुवात मोठ्या गोष्टींमधूनच व्हायला हवी असे नाही, तर दैनंदिन जीवनात बदल करूनही योगदान देऊ शकतो. कॅम्पसमध्ये, घर – परिसरात प्लास्टिकचा वापर टाळा, ऊर्जा, पाणी बचत करा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.वृक्षारोपण कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. नितीन कोळी, पुष्कर देशपांडे, डॉ. अजय लाड, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. नीलेश कडू, कार्यकारी अभियंता शशिकांत रोडे, उपकुलसचिव डॉ. दादा चव्हाण, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, उपकुलसचिव मोनाली तोटे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, सहा. कुलसचिव डॉ. वीरेंद्र निमजे, अनिल मेश्राम, डॉ. हेमलता नंदुरकर, डॉ. प्रशांत गावंडे, डॉ. यादवकुमार मावळे, डॉ. अनिता पाटील, डॉ. जयंत वडतकर, डॉ. दिलीप काळे, डॉ.जी.जी. मुळे, उद्यान अधीक्षक भीम वाठोरे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *