राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान:जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; मोझरीचे जनार्धन बोथेंना ‘पद्मश्री’, ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान
अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात आज, सोमवार, २५ मे रोजी मानाचा तुरा रोवला गेला आहे. मोझरी येथील थोर समाजसेवक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या बहुमानामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंतांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाल्याची भावना व्यक्त…