- Marathi News
- National
- 11 People Died In A Boiler Explosion At A Vedanta Company In Chhattisgarh, 500 Degree Boiling Steam Fell On The Workers
जांजगीरकाही सेकंदांपूर्वी
- कॉपी लिंक

छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील सिंघीतराई येथील वेदांत पॉवर प्लँटमध्ये मंगळवारी ६०० मेगावॅट युनिट-१ मध्ये बॉयलरचा बॉटम रिंग हेडर फुटला. यामुळे २६ मजुरांवर ५०० अंश सेल्सियसची उकळती वाफ पडली. या वाफेच्या तडाख्यात येऊन ११ मजुरांचा मृत्यू झाला. तर इतर १५ मजूर गंभीररीत्या भाजले.
हा अपघात मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास झाला. त्या वेळी प्लँटमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू होते. तिथे मोठ्या संख्येने मजूर उपस्थित होते. हा स्फोट इतका भीषण होता की ५०० अंश सेल्सियस तापमानाची उकळती वाफ सगळीकडे पसरली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अति दाबामुळे अपघात
औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभागाचे सहायक संचालक अश्विनीकुमार पटेल यांच्या मते, स्टीम पाइपमध्ये वाफेचा दाब खूप वाढल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. जेव्हा वाफेचा दाब ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाला तेव्हा पाइपलाइनचा सर्वात कमकुवत भाग फुटला.