Headlines

विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश गाठावे:अविनाश ठाकरे; माळी महासंघातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव‎




प्रतिनिधी |अकोट दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावी व बारावीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन माळी महासंघाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी टक्केवारीचा विचार न करता आत्मविश्वासाने यश गाठावे, असे प्रतिपादन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी याप्रसंगी केले. अकोट शहरात राम नारायण मंगल कार्यालयात सत्कार सोहळा पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सचिव रवींद्र अंबळकार, राजेश जावरकर, दीपक खलोकार, प्रथमेश बोरोडे, अचल बेलसरे, सचिन जुनगरे, राधेश्याम बहादुरे वैद्य, सचिन भुस्कट, मिलिंद झाडे, काँग्रेसचे प्रदेश महासचिव महेश गणगणे, स्वप्निल सोनार आदी उपस्थित होते. गुणगौरव सत्कार सोहळ्यात उपस्थितांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या गरीब कठीण परिस्थितीत जीवनातील आपल्या करिअरचे टक्केवारीचा विचार न बाळगता आत्मविश्वासाने आपले टार्गेट यश गाठावे जेणेकरून आपले जीवनाचे शिक्षणाचे सार्थक होऊन आपला पाया पूर्ण होईल असे ठाकरे म्हणाले. कार्यक्रमाला जगन बगाडे, सचिन बेलोकार, अजय अडोकार, नितीन शेगोकार, हर्षल खाजबागे, केशव लांडे, अतुल लोखंडे, रवींद्र पोटदुखे, कमलेश यावले, रोहित नाथे यांचे योगदान लाभले. माळी महासंघातर्फे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. ४२ गुणवंतांचा सत्कार सत्कारमूर्ती अविनाश ठाकरे, दीपक खलोकार, रवींद्र पोटदुखे, नंदकिशोर शेगोकार, आशना बनसोड, पूर्वा लांडे, समर्थ गनोरकार, रिद्धी पोटदुखे व बारावीचे विद्यार्थी गायत्री लांडे, ऋतुजा काळे, वेदांत गावंडे , सार्थक अंबळकारसह ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा आई-वडिलांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *