Headlines

बापाने बिबट्याच्या जबड्यातून 4 वर्षीय लेकीला खेचून काढले:डोंगरगाव येथील काळजाचा ठोका चुकवणारी घटना‎

आढळा खोऱ्यातील डोंगरगाव येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास काळीज हेलावून टाकणारी एक थरारक घटना घडली. घराबाहेर अंगणात आईच्या पाठीवर बसलेल्या ४ वर्षांच्या अवणीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने भक्ष्य समजून झडप घातली. बिबट्या अवणीला जबड्यात पकडून ओढत नेत असताना, तिच्या वडिलांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी थेट दोन हात केले. बापाच्या या अद्भूत धाडसापुढे बिबट्याला माघार घ्यावी…

Read More

कुटूंबियांचा आक्रोश:बिडकीनला एकावेळी चार मित्रांच्या अंत्ययात्रा, एकावर सोमपुरीत अंत्यविधी‎

येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रविवारी शोकाकुल वातावरणात चार तरुणांवर बिडकीनला तर एकावर मुळगावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. २० जून रोजी बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील पाच तरुण…

Read More

उद्धव यांचा 7 वा MP ही शिंदे गटात जाणार होता:त्यांना मंत्री पद हवे होते, गोष्ट जमली नाही, ठाकरेंच्याच बाजूला बसतो -शिवसेना नेते

शिवसेना नेते रामदास कदम यांनी दावा केला आहे की, उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांव्यतिरिक्त आणखी एक खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील होऊ इच्छित होता. कदम यांनी सोमवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना सांगितले की, सातव्या खासदारानेही कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती, परंतु त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली. एकनाथ शिंदे यांनी नकार दिल्यानंतर ते परत गेले. तथापि, कदम यांनी…

Read More

दैनंदिन योग हा शांत व निरोगी मनाची गुरुकिल्ली:शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित योगसत्रात डॉ. जे. डी. पवार यांचे प्रतिपादन‎

मानवी जीवनातील योगाभ्यासाचे महत्व स्पष्ट करून दैनंदिन योग हा निरोगी तनाची व शांत मनाची गुरुकिल्ली आहे, प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास योगाभ्यास केला पाहिजेच, त्यामुळे दिवसभरातील कामांना ऊ र्जा व उत्साह मिळत असल्याचे डॉ. जे. डी. पवार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे. डी. पवार व…

Read More

राज बब्बर@74; रेपचा सीन पाहून रडली होती आई:मुस्लिम पत्नीने धर्म बदलण्यास नकार दिला, शाहरुखने विचारले- खरंच चुंबन घेता का?

महाभारत बनवणारे बी.आर. चोप्रा या शोपूर्वी एक चित्रपट बनवत होते. नाव होतं ‘इंसाफ का तराजू’. चित्रपटात खलनायक रमेश गुप्ता बनण्यासाठी कोणताही मोठा अभिनेता तयार नव्हता, ज्याला झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या पात्रांवर बलात्कार करताना दाखवायचे होते. प्रत्येक अभिनेत्याला भीती होती की ही भूमिका त्याची प्रतिमा खराब करेल. तेव्हा एका नवोदित अभिनेत्याने या भूमिकेसाठी होकार…

Read More

कळवण आगारातून सप्तश्रृंगगडासह नाशिकसाठी धावणार आधुनिक बस:5 ‘राजमाता जिजाऊ'' बस दाखल; आणखी 10 बस मिळणार‎

येथील एसटी महामंडळाच्या आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्या असून, या बसेसद्वारे कळवण-नाशिक आणि कळवण-सप्तश्रृंगगड मार्गावर सेवा दिली जाणार आहे. या बसेसचे लोकार्पण नगराध्यक्ष कौतिक पगार यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील दुर्गम भागातील प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या बसेस आगारात दाखल करण्यात आल्या आहेत….

Read More

मिरचीपूड फेकून लुटणारी टोळी जेरबंद:लाडची येथील रस्तालुटीचा 15 दिवसांत उलगडा; हरसूल पोलिसांची कामगिरी‎

महिला बचत गटाचे संकलित पैसे घेऊन जाणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर मिरचीपूड फेकून रोख रक्कम व टॅब लुटणाऱ्या तिघा संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोख रक्कम, टॅबलेट, मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . याबाबत माहिती अशी की, एयू फायनान्स कंपनीचा कर्मचारी…

Read More

DM नी स्वीकारली राम मंदिराची जबाबदारी:आता विश्वस्त निर्णय घेत नाहीत; देणग्यांच्या मोजणीत 3 मोठे बदल

अयोध्या श्रीराम मंदिरात अर्पण केलेल्या देणग्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विशेष तपास पथकाने (SIT) आपला प्राथमिक तपास पूर्ण केला आहे. SIT प्रमुख विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखाली अहवालही तयार करण्यात आला आहे. हे प्रकरण कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेशी संबंधित असल्याने, हा अहवाल प्रथम पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) पाठवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

सैन्यदलात निवड झालेल्या जोपूळच्या वीर भूमिपुत्रांसह माता-पित्यांचा नागरी सत्कार:जोपूळची माती देशाचे रक्षण करणारे वीर योद्धेही घडवते‎

चांदवड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय सैन्यदलात नुकतीच निवड होऊन जोपूळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या पाच वीर भूमिपुत्रांचा आणि त्यांच्या माता-पित्यांचा नागरी सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. चांदवड बाजार समितीचे माजी सभापती संजय जाधव यांच्या हस्ते हा Source link

Read More

पैठणला 35 मिनिटे वाऱ्यासह पाऊस; 12 झाडे उन्मळली:तीन जण जखमी, काही घरांवरील पत्रे उडाले, धान्य मार्केट परिसरामध्ये पाणी तुंबले‎

गेल्या काही दिवसांपासून उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे हैराण झालेल्या पैठणकरांना अखेर सोमवारी दिलासा दिला. दुपारी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन आलेल्या या पहिल्याच पावसाने वादळी वाऱ्यासह शहराला झोडपून काढले. अवघ्या ३५ मिनिटांत झालेल्या या वादळी पावसामुळे शहरात १२ झाडे कोसळली असून, काही घरांवरील पत्रे उडाल्याने पडझड झाली आहे. या दुर्घटनेत ३ जण जखमी झाले…

Read More