Headlines

दिव्य मराठी एक्सपोज:कुंभमेळ्याच्या स्नान घाटांसाठी जमिनीचा गैरव्यवहार, कोर्टाचा आदेश डावलून ‘पाटबंधारे’ने खरेदी केली 5.11 कोटींची जमीन

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गाेदाकिनारी स्नानघाट बांधण्यात येणाऱ्या स्नानघाटांच्या जमिनीत खरेदीचा गैरव्यवहार झाल्याचे पुढे येत आहे. न्यायालयाचा मनाईहुकूम असताना पाटबंधारे विभागाने ५ काेटी ११ लाख रुपये शासकीय निधीतून १५०० चाै.मी. जागा खरेदी केल्याचे उघड हाेत आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या या मनाईहुकूमाची नाेंद संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरही आहे. तसेच सरकारी पॅनलच्या वकिलांचा या व्यवहारासाठी नकारात्मक अहवाल असतानाही पाटबंधारे…

Read More

गुवाहाटीच्या नाईटक्लबमध्ये महिलेशी गैरवर्तन, कपडे काढून मारहाण:बाउन्सरांवर आरोप, व्हिडिओत दोन महिला लाथा मारताना दिसल्या; मॅनेजर ताब्यात

आसाममधील गुवाहाटीच्या खानापारा परिसरातील एका नाईटक्लबमध्ये गुरुवारी रात्री उशिरा महिलेशी मारहाण आणि गैरवर्तन केल्याचे प्रकरण समोर आले. बाउन्सर्सनी महिलेला कपडे काढून मारहाण केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण द लोकल्स कॅफे अँड लाउंजमधील आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यात महिला पार्किंग परिसरातील जमिनीवर विवस्त्र अवस्थेत दिसत आहे. दोन महिला तिला लाथा मारताना…

Read More

केतन अग्रवाल खून:हत्या झालेल्या जागेवर 18 दिवसांपूर्वींच सियाने केतनचे पाठमोरे फोटो काढले होते; 1801 चॅट, डिलीट डेटा फॉरेन्सिकमधून रिकव्हर

५ हजार पानी आरोपपत्रात हत्येच्या पूर्वनियोजित कटाचे पुरावेलोहगड किल्ल्यावरून पडून झालेला केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ५ हजार ५३ पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, त्यात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधातील अनेक डिजिटल पुरावे मांडण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, ३१…

Read More

विधान परिषद निवडणूक महायुती म्हणून लढणार : महसूलमंत्री:‘पदवीधर’साठी केणेकर मुंबईत; पण बावनकुळेंनी दिले ‘महायुती’चे संकेत

राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या जागावाटपाबाबत २ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात बैठक झाली आहे. या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत हे निश्चित. महायुतीतील घटक पक्षाकडे संबंधित मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र याबाबत बोलण्याचा अधिकार मला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

Read More

महाराष्ट्रावर 8 लाख 57 हजार कोटी रुपयांच्या विक्रमी गुंतवणुकीचा पाऊस:महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट परिषदेमध्ये महायुती सरकारचे विविध कंपन्यांसोबत करार

कोणतीही पूर्वघोषणा नाही की भव्य आयोजनाचा कोणताही गाजावाजा न करता महायुती सरकारने गुरुवारी रात्री ‘महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट परिषद’ आयोजित करत तब्बल ८ लाख ५७ हजार ४५२ कोटी रुपयांच्या ६७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या करारांमुळे राज्यात २ लाख ९१ हजार १०९ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होण्याचा दावा करण्यात आला आहे….

Read More

महाराष्ट्राच्या कुमकुमने साधला सुवर्णवेध!:धनुष्याचे नवे हँडल जमले नाही, जुनेच वापरून मोक्याच्या क्षणी 10 पैकी 10 गुण मिळवले; यशदीपने मिळवले रौप्य

अमरावतीची अग्रणी महिला धनुर्धर, १७ वर्षीय कुमकुम अनिल मोहोडने जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवार, २ रोजी रिकर्व्ह सांघिक प्रकारात १० वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या दिग्गज दक्षिण कोरिया संघाला पराभूत करून भारताला पहिले ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. जुने धनुष्य नव्हे, तर रिकर्व्ह धनुष्याचे जुनेच हँडल वापरून कुमकुमने आशियाई क्रीडा स्पर्धेत…

Read More

धरापुरम निवडणूक सभेत स्टॅलिन म्हणाले- विजय ‘रील्स’वाले CM:सल्ला दिला- मुख्यमंत्र्यांसारखे वागा, ‘चीप मिनिस्टर’सारखे नाही

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि DMK अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी विजय यांना ‘रील्स’वाले मुख्यमंत्री म्हटले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांसारखे वागावे, ‘चीप मिनिस्टर’सारखे नाही, असेही सांगितले. स्टॅलिन शुक्रवारी धरापूरम येथे निवडणूक सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी ते म्हणाले- “ज्यांच्याकडे बहुमताचा पाठिंबा नाही, अशा रील्सवाल्या मुख्यमंत्र्यांच्या अहंकाराला मतदानातून उत्तर द्यावे लागेल. मी येथे केवळ मते मागण्यासाठी आलेलो नाही….

Read More

काँग्रेसकडून 3 उमेदवारांची यादी जाहीर:नागपूर पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा

राज्यातील विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आघाडी घेत नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी आपल्या तीन उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. यामुळे उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार, दोन विद्यमान आमदारांना पुन्हा…

Read More

मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीसाठी मोठी बातमी:मानखुर्दमध्ये 14 एकर जागा चित्रीकरणासाठी उपलब्ध; महसूल विभागाची हिरवी झेंडी

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मानखुर्दमधील अंदाजे 14 एकर शासकीय जमीन आता चित्रपट, मालिका आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बाह्य चित्रीकरणासाठी उपलब्ध होणार आहे. महसूल विभागाने या जागेचा वापर चित्रीकरणासाठी करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. ही जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने, मुंबईतील चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक क्षेत्राला मोठी सुविधा मिळणार…

Read More

आमदार परगट सिंह पंजाब काँग्रेसचे नवे अध्यक्ष:मंत्री आणि ऑलिम्पियन हॉकी संघाचे कर्णधार राहिले आहेत; सकाळी वडिंग यांनी राहुल गांधींकडे राजीनामा सुपूर्द केला होता

काँग्रेसने जालंधर कँटचे आमदार परगट सिंह यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटी (PPCC) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशात आराधना मिश्रा यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमध्ये 2027 मध्ये निवडणुका होणार आहेत. यापूर्वी शुक्रवारीच खासदार अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. दिल्लीतील 10 जनपथ येथील…

Read More