आमठाण्यात दुष्काळी पंचनाम्यांना सुरुवात:त्रिस्तरीय समिती बांधावर
आमठाणा व परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्या त्रिस्तरीय समितीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. सध्या तलाठी विशाल पाटील व ग्रामविकास अधिकारी बंसिधर पडूळकर यांच्यासह समितीतील संबंधित अधिकारी शेतावर जाऊन दुष्काळामुळे पिकांवर…