पीरबावड्यात शेतकऱ्यांचा पंचनाम्यांना विरोध:दुष्काळ जाहीर असताना वैयक्तिक पंचनामे कशासाठी; शेतकऱ्यांचा सवाल
शासनाने सरसकट दुष्काळ जाहीर केलेला असताना वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी गावात आलेल्या तलाठी व सहायक कृषी अधिकाऱ्यांना पीरबावडा येथील शेतकरी व नागरिकांनी विरोध केला. दुष्काळाची भीषण परिस्थिती सर्वत्र स्पष्ट असताना प्रत्येक शेतकऱ्याचा स्वतंत्र पंचनामा करण्याची प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका घेतली. वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी अधिकारी पिरबावडा येथे दाखल झाले असता शेतकरी एकत्र आले. त्यांनी पंचनामे करण्यास…