Headlines

ऑनलाइन नजरकैद:दहशतवाद्यांना फंडिंगचा धाक; वृद्धेस डिजिटल अरेस्ट करून 3.80 कोटी उकळले, नाशिक क्राइम ब्रँचचा तोतया अधिकारी बनून रचला कट


मोबाइल क्रमांकाचा गैरवापर करून मुंबईत बनावट बँक खाते उघडल्याचा आणि त्यातून थेट देशविघातक दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याचा खोटा आरोप ठेवून शहरातील एका उच्चवर्गीय ७५ वर्षांच्या वृद्धेला सायबर भामट्यांनी १४ दिवस ऑनलाइन नजरकैदेत (डिजिटल अरेस्ट) ठेवले.

.

पोलिस ठाण्याचा हुबेहूब सेटअप

फिर्यादीला व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ कॉल केला. यात समोरील व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात बसलेली होती. तिच्या मागे तिरंगा आणि निळ्या रंगाचा पोलिसांचा झेंडाही दिसत होता. त्यामुळे फोन करणारी व्यक्तीच पोलिस असल्याचा फिर्यादीचा विश्वास बसला. तपासाच्या नावाखाली भामट्यांनी सर्व बँक व्यवहारांची माहिती घेतली. फिर्यादीच्या नावे असलेल्या ‘एफडी’ची खातरजमा करून, त्यांना सर्व एफडी मोडायला लावल्या.

परराज्यांत गेले पैसे

फिर्यादीच्या खात्यातील पैसे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांतील खात्यांमध्ये वळवण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ पावले उचलत खात्यातील ३२ लाख रुपयांची रक्कम गोठवली (फ्रीज) आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *