Headlines

सोबलगाव येथे पोलवर चढलेल्या तरुणाचा तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू:तरुण विजेच्या पोलवर चढल्याचे कारण अस्पष्ट, आज होणार अंत्यसंस्कार‎




विद्युत पोलवरील विजेच्या तारेला अचानक स्पर्श झाल्याने २७ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोबलगाव (ता. खुलताबाद) शिवारात घडली. नीलेश हरी बनसोड (२७, रा. सोबलगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बाजारसावंगी जवळील पाडळी शिवारामधील सोबलगाव रस्त्यावर असलेल्या महावितरणच्या विजेच्या पोलवर निलेश हा तरुण गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चढला होता. या दरम्यान त्याचा अचानक विद्युत वाहक तारेला स्पर्श झाला. जोराचा शॉक बसल्याने तो थेट खाली कोसळला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला घोषित केले. दरम्यान, संबंधित तरुण विजेच्या पोलवर नेमका कशासाठी चढला होता, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेचा पुढील तपास बाजारसावंगी चौकीचे पोलिस करत आहे. पत्नीसह दोन लहान मुलांचे छत्र हरपले मृत नीलेश हे विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोबलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वाजता सोबलगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *