Headlines

'त्या' वादग्रस्त पोस्टशी माझा संबंध नाही!:'गुंगी गुडिया' वादावर पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले- सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या सोशल मीडियावरून त्यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आला. या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या भाषेवर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. “एका पक्षाला ही भाषा शोभते का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा…

Read More

बालविकास, महिला सक्षमीकरणात प्रत्येकाचे योगदान गरजेचे:अमृता फडणवीस यांचे ग्रॅव्हिट्स ऊर्जा पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन

अमृता फडणवीस यांनी बालविकास आणि महिला सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज व्यक्त केली आहे. पुणे येथे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार महिला, लहान मुले आणि पर्यावरणासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ज्येष्ठ…

Read More

Salman Khan Roasts Badshah on Alliance Reality Show; Watch Video

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता सलमान खान ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रसारित होत असलेल्या ‘अलायन्स’ या रिॲलिटी शोच्या नवीन एपिसोडमध्ये दिसले. सलमान त्यांचे भाऊ सोहेल खान यांना पाठिंबा देण्यासाठी शोच्या सेटवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी रॅपर बालीसोबत बोलताना गायक आणि रॅपर बादशाहवर विनोदी शैलीत टोमणा मारला. बादशाहवर टोमणा मारला, म्हणाले- त्यांना स्वतःला समजले का?…

Read More

दरमहा लाखावर पगार, तरीही चार हजारांसाठी लाचखोरी!:वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, धर्माबाद तालुक्यातील प्रकार

दरमहा सुमारे 1 लाख 5 हजार वेतन घेणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला केवळ 4 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे (वय 35) यांच्याविरुद्ध ही कारवाई सोमवारी (3 ऑगस्ट) दुपारी करण्यात आली. तक्रारदार…

Read More

दोन महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल:खोट्या पंचनाम्याचा अहवाल दडपण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

खोट्या पंचनाम्याचा अहवाल सादर न करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी आणि कोतवालाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदार हे ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांच्या कंपनीकडून सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीच्या पायाचे…

Read More

पुणे महात्मा फुले मंडईतील गाळेधारकांवर भाडेवाढ:नगरसेवक राघवेंद्र मानकर यांची पुनर्विचार करण्याची मागणी

पुणे शहरातील ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील २२०० गाळेधारकांच्या भाडेवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी केली आहे. गाळेधारकांची आर्थिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप आणि मागील काही वर्षांतील प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन न्याय्य व परवडणारे भाडे निश्चित करावे, असे त्यांनी म्हटले आहे. कोविड-१९ महामारी, दीर्घकाळाचे लॉकडाऊन, ग्राहकसंख्येत झालेली घट तसेच मंडई परिसरातील मेट्रो…

Read More

प्रियांक खरगे म्हणाले- उपोषणाला बसा, लाठी खा, मग राजीनामा देईन:नंतर म्हणाले- माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; भाजपने म्हटले- परीक्षेतील गोंधळाची खिल्ली उडवली

कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खरगे यांनी सोमवारी सांगितले की, जे लोक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, त्यांनी आधी 25 दिवस उपोषणाला बसावे आणि मग लाठीचार्जचा सामना करावा. खरं तर, विजयपुरा येथील एका परीक्षा केंद्रावर पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेदरम्यान ओएमआर शीटचे सिरीयल नंबर प्रश्नपत्रिकेशी जुळत नव्हते. यानंतर अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रातून बाहेर आले आणि पुन्हा परीक्षा घेण्याची…

Read More

"हा केवळ माझ्या आईचा नाही, तर प्रत्येक महिलेचा अपमान!":सुनेत्रा पवारांवरील टीकेवर जय पवारांचे काँग्रेसला सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या सोशल मीडियावरून ‘गुंगी गुडिया’ अशी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त पोस्टप्रकरणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सध्या काँग्रेसवर चहुबाजूंनी जोरदार टीका होत असून,…

Read More

'गुंगी गुडिया' वक्तव्यावर अमृता फडणवीस आक्रमक:म्हणाल्या – महिलांबद्दल अशा प्रकारची हिणकस भाषा वापरणे अत्यंत चुकीचे; सुनेत्रा पवार सक्षम नेत्या

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविषयी वापरलेल्या “गुंगी गुडिया” या शब्दाबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी अमृता फडणवीस यांनी केली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसवर टीका करत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. अमृता फडणवीस म्हणाल्या की, महिलांबद्दल अशा प्रकारची हिणकस भाषा वापरणे अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेसने महिलांचा सन्मान राखला पाहिजे. सुनेत्राताई सक्षम नेतृत्व करणाऱ्या…

Read More

बोजा नोंदीसाठी लाचेची मागणी महागात:राजाचे कुर्लेतील तलाठी, कोतवाल ACBच्या सापळ्यात; 3 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

सातारा जिल्ह्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी धडक कारवाई करत खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि कोतवाल यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील ६३ वर्षीय शेतकरी यांनी कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेकडून ५…

Read More