Headlines

आयटी प्रकल्पांचे आमिष दाखवून 1.85 कोटींची फसवणूक:कंपनी स्वतःची असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांनी फसवले; दोघांविरोधात गुन्हा




आयटी कंपनीला प्रकल्प मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट अॅग्रीमेंट आणि कागदपत्रांच्या आधारे दोघांची एक कोटी ८५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. कंपनी स्वतःच्या मालकीची असल्याचे भासवून भागीदारीत कंपनी स्थापन करण्यास आणि मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रवीण दत्तू शेळके आणि निता प्रवीण शेळके (दोघे रा. गल्ली क्रमांक ३०बी, गणेश व्हिला सोसायटी, धायरी, पुणे), तसेच रिचर्ड पॅट्रिज यांच्यावर नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिचर्डचे पूर्ण नाव आणि पत्ता उपलब्ध नाही. याबाबत तुषार तेजराम घडाळे (रा. फ्लॅट क्रमांक बी/२०४, सेलेस्टियल सिटी, फेज दोन, रावेत, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मे २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नऱ्हे येथील नवले ब्रिजजवळील नवले आयकॉनमधील इंपिरिकल बिझनेस सेंटर, सहाव्या मजल्यावरील कार्यालय क्रमांक ६०३ येथे व्यवहार झाले. हे कार्यालय प्रिस्टन इन्फो ग्लोबल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे. व्यवहारांच्या नेमक्या वेळा उपलब्ध नाहीत. आरोपींनी कंपनीसाठी प्रकल्प मिळवून देण्याकरिता बनावट अॅग्रीमेंट व कागदपत्रे पाठविल्याचा आरोप आहे. दोन लाख ८० हजार रुपये घेण्याच्या व्यवहाराचाही फिर्यादीत उल्लेख आहे. घडाळे आणि त्यांचे मित्र विवेक भारती यांच्या ई-मेल पत्रव्यवहार व करारनाम्यांचा वापर करून कंपनी स्वतःची असल्याचे भासविण्यात आले. प्रकल्प मिळणार नसल्याचे माहिती असूनही भागीदारीतील कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याची तक्रार आहे. कंपनीत ‘कृष्णा जी’ नावाने ट्रेनर नेमल्याचाही उल्लेख आहे. पोलिस उपनिरीक्षक मालुसरे तपास करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *