Headlines

श्रीकांत शिंदेंसह शिंदे गटाच्या खासदारांनी घेतली अमित शाहांची भेट:राज्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या इतर खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून या भेटीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, काही काळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावत त्यांचे सहा खासदार आपल्याकडे वळवण्यात शिंदे गटाला यश आले होते. या पार्श्वभूमीवर, दिल्लीत झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीमुळे राज्यात…

Read More

बिग बॉसमध्ये सलमान खानसोबत दिसणार शाहरुख!:सलमान म्हणाला- जे करण-अर्जुनमध्ये झाले होते तेच पुन्हा होईल; 6 सप्टेंबरपासून सुरू होईल शो

रिॲलिटी शो ‘बिग बॉस 20’ चा पहिला प्रोमो निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. यामध्ये सलमान खान होस्ट म्हणून परत येताना दिसत आहे. प्रोमोमध्ये सलमानने ‘करण-अर्जुन’चा उल्लेख करून एक नवीन सस्पेन्स निर्माण केला आहे. हा नवीन सीझन 6 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याचे प्रसारण दररोज रात्री 9 वाजता जिओहॉटस्टारवर आणि रात्री 10:30 वाजता कलर्स टीव्हीवर केले जाईल….

Read More

'इतक्या खालच्या स्तराला जाणारे पहिल्यांदाच पाहिले':CM फडणवीसांचे प्रत्युत्तर, एकनाथ शिंदे म्हणाले- सुनेत्रा पवारांचा नव्हे तमाम माता-भगिनींचा अपमान

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत समाचार घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया…

Read More

नीलम गोऱ्हे यांचा हर्षवर्धन सपकाळांना खोचक टोला:सुनेत्रा पवारांवरील टीकेला 'नसती उठाठेव' म्हणत मूर्ख संबोधले

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर शिवसेना नेत्या व माजी विधानपरिषद उपसभापती, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आक्रमक शब्दांत टीका केली. “सपकाळ यांच्या वक्तव्याला दोन शब्दांत उत्तर द्यायचे झाले तर ते म्हणजे ‘नसती उठाठेव’,” असा टोला त्यांनी लगावला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, एकेकाळी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याविरोधात विरोधक ज्या प्रकारची भाषा वापरत…

Read More

दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या चातुर्मास कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ:नाशिकच्या चैतन्य महाराजांच्या कीर्तनाने महोत्सवाची सुरुवात

‘राम कृष्ण हरी’ च्या गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या चातुर्मास कीर्तन महोत्सवाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ झाला. जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाशिक येथील वारकरी भूषण ह.भ.प. चैतन्य महाराज निंबोळे यांचे कीर्तन झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि…

Read More

शेतकऱ्यांच्या साहित्यचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप वाहन, मोटार पंप तसेच इतर शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा वालचंदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतीसाठी वापरण्यात येणारे ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटार पंप, केबल वायर आणि इतर साहित्य चोरीच्या घटना वाढल्या…

Read More

Bamucto Demands NEP 2020 Teaching Workload Clarity; Urges Higher Education Dept

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) च्या अंमलबजावणीदरम्यान महाविद्यालयीन प्राध्यापकांचा अध्यापन कार्यभार, पदनिर्धारण, तासिकातत्त्वावरील प्राध्यापकांची मान्यता आणि प्रवेशित विद्यार्थी संख्या निकष यांबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे राज्यभरात मोठा . शासनाने यावर तत्काळ निर्णय घेतल्यास राज्यातील महाविद्यालये, प्राचार्य व प्राध्यापकांमधील प्रशासकीय संभ्रम दूर होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित राहील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष…

Read More

राहुल गांधी म्हणाले- RSS इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतोय:देश सहन करणार नाही, पंतप्रधानांनी सरकारच्या कामांसाठी माफी मागावी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले की, देशातील विद्यार्थी गंभीर वेदनेत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माफीची गरज नाही, तर पंतप्रधान त्यांच्या सरकारच्या कामांसाठी त्यांची माफी मागावी अशी त्यांची इच्छा आहे. माजी खासदार वायको यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, कारण RSS देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत…

Read More

काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात तीव्र आंदोलन:महिला नेतृत्वाचा कथित अपमान केल्याने काँग्रेस भवनसमोर घोषणाबाजी

महिला नेतृत्वाबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुण्यात जोरदार आंदोलन केले. बालगंधर्व चौकातील झाशीची राणी यांच्या पुतळ्यासमोर तसेच काँग्रेस भवनासमोर घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता येथे प्रदीप देशमुख, सुभाष जगताप आणि राजलक्ष्मी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला नेतृत्वाचा सन्मान…

Read More

जगभरात अन्न कंपन्यांच्या खटलेबाजीमध्ये लागले 600 वर्षे:WHOचा आरोप; न्यायालयीन फेऱ्यांमध्ये अडकवून लठ्ठपणाविरोधातील मोहीम कमकुवत करत आहेत ब्रँड्स

जगातील सर्वात मोठ्या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (पॅकेज्ड चिप्स, नमकीन, क्रिस्प्स) कंपन्या निरोगी खाण्यापिण्याला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारी धोरणांना न्यायालयात खेचून लठ्ठपणाविरोधातील जागतिक मोहिमेला कमकुवत करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) चे महासंचालक टेड्रोस ॲडनॉम गेब्रेयेसस यांचे तरी किमान हेच मत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या कंपन्यांच्या खटलेबाजीमुळे देशांना आरोग्य आणि कायदेशीर खर्चापोटी हजारो कोटी रुपये गमवावे…

Read More