Headlines

शिक्षकांच्या कमतरतेमुळे बोडखा जिल्हा परिषद शाळेस ठोकले टाळे:6 शिक्षकांची मागणी, आश्वासनाशिवाय कुलूप न उघडण्यावर ग्रामस्थ ठाम‎




तालुक्यातील बोडखा येथील जिल्हा परिषद मराठी आणि प्राथमिक व माध्यमिक शाळा उर्दू माध्यम येथील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी गावकऱ्यांनी आणि शाळा समितीने शाळेला थेट कुलूप ठोकून आंदोलन छेडले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुसऱ्या दिवशीही शाळा बंदच राहिली. नवीन शिक्षकांच्या नियुक्तीचे पत्र मिळेपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा आक्रमक पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. बोडखा येथील मराठी माध्यमाच्या १ ली ते ७ वी वर्गात १३० विद्यार्थी असून केवळ ३ शिक्षक मंजूर आहेत. त्यातील एक शिक्षक बीएलओ कामात असल्याने दोन शिक्षकांवर संपूर्ण शाळेचा भार आहे. उर्दू माध्यमात १ ली ते ९ वीचे ११० विद्यार्थी असून येथे २ शिक्षक आहेत; त्यातही एक शिक्षक बीएलओ ड्युटीवर असल्याने एकाच शिक्षकाला १ ते ९ वीचे वर्ग सांभाळावे लागत आहेत. यामुळे २४० विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असल्याचे सविताबाई सोनवणे, बाळू सोनवणे, मुस्तफा पटेल, प्रकाश जाधव, अरफात शहा, अनिल जाधव आणि अक्रम पटेल यांनी सांगितले. गटशिक्षणाधिकारी यांनीू भेट दिली. मा्त्र, लेखी आश्वासन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *