Headlines

रत्नापूर तलावामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू:मित्राच्या वाढदिवसासाठी गेले होते‎

भानखेड परिसरातील जंगल भागात, भानखेड मुख्य मार्गापासून सुमारे अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नापूर तलावात दोन मुले बुडाले. ही घटना गुरुवारी २ ऑक्टोबरला सायंकाळी घडली. शहरातील आठ ते नऊ मुले तलाव परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यापैकी दोघे तलावातील पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक, पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दोन्ही…

Read More

गाडी पार्किंगवरुन मित्राचे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचाच टेंभुर्णीमध्ये भोसकून खून:मामा-भाच्यासह ६ जणांवर गुन्हा, दोघांना अटक

वाहनाच्या पार्किंगवरून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी नाळेवस्ती परिसरात मध्यस्थी करायला गेलेल्या एका ४१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास घडली. नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय ४१, रा. वेणेगाव, ता. माढा) असे मृत तरुणाचे नाव असून या हल्ल्यात सद्दाम पटवारी हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी…

Read More

अहिल्यानगर:मध्यरात्री अल्पवयीन मुलीचा पाठलाग मुक्ती वाहिनीच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ

एकीकडे शहरात गणेश विसर्जनाचा जल्लोष सुरू असताना मध्यरात्री एका अल्पवयीन मुलीवर ओढावलेले संकट टळले. ठाणे परिसरातील या मुलीने घरच्यांच्या विवाहाच्या दबावाला कंटाळून घर सोडले होते. अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर उपाशी व बेवारस अवस्थेत बसलेल्या या मुलीला एका व्यक्तीने जेवणाचे आमिष दाखवून निर्जन ठिकाणी नेऊन गैरवर्तनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळेवर पोहोचलेल्या ‘मुक्ती वाहिनी’मुळे ती बचावली. मुक्ती वाहिनीच्या…

Read More

CJP च्या आंदोलनात सहभागी झाले नसीरुद्दीन शाह:पोलिसांची परवानगी नव्हती, दिपकेंना मिठी मारली; शबाना आझमी-विशाल ददलानीही पोहोचले

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात नसीरुद्दीन सहभागी झाले. पोलिसांची परवानगी मिळाली नसतानाही कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या या आंदोलनात अभिनेत्री शबाना आझमी आणि संगीतकार विशाल ददलानीही पोहोचले. शर्लिन चोप्रा आणि विशाल भारद्वाज यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सरकारविरोधात आवाज उठवला. या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे आंदोलनस्थळी मोठी…

Read More

दुरवस्था:लाखो रुपयांची शौचालये कुलूपबंद; शेवगावात ‘स्वच्छ भारत’चा बोजवारा!

स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करत नागरिकांच्या आरोग्याच्या नावाखाली सार्वजनिक निधीतून लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रत्यक्षात सार्वजनिक शौचालये कुलूपबंद आणि धूळ खात असल्याचा आरोप शेवगाव नगरपरिषद हद्दीत करण्यात आला आहे. नाईकवाडी आणि नीलकंठनगर परिसरातील शौचालयांची दुरवस्था जीपीएस फोटो पुराव्यांसह समोर आणत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत बप्पासाहेब घुमरे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे….

Read More

12 ग्रा.पं.च्या समावेशासह वाळूज नगर परिषद होणार:जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणांकडून अहवाल मागवला

वाढती लोकसंख्या आणि नागरी समस्यांनी वेढलेल्या सिडको वाळूज महानगर परिसरासाठी स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी छत्रपती संभाजीनगर व गंगापूर तालुक्यांतील १२ प्रमुख ग्रामपंचायतींची मिळून नगर परिषद स्थापन करण्याबाबत सविस्तर अहवाल मागवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगररचना विभागाला…

Read More

कॅम्पस क्राइम:व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याचा राग, विद्यार्थ्यावर केला कटरने हल्ला; संभाजीनगरमधील घटना

महाविद्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर काढल्याचा सूड उगवण्यासाठी एका तरुणाने प्रथम वर्ष बी.टेकच्या विद्यार्थ्यावर कटरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील महाविद्यालयाच्या गेट क्रमांक ५ जवळील मोकळ्या मैदानात ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरावर तब्बल आठ…

Read More

हरलीन सेठी स्वतःला सुंदर मानत नव्हती:म्हणाली- ‘ब्रोकन’ने आयुष्य बदलले; प्रेक्षकांच्या कौतुकामुळे आत्मविश्वास मिळाला, स्वतःवर प्रेम करायला शिकले

सहज भावणारा चेहरा, दमदार अभिनय आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हरलीन सेठीने आपल्या प्रत्येक भूमिकेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’, ‘कोहरा’, ‘बॅड कॉप’ आणि ‘डॉक्टर्स’ यांसारख्या प्रोजेक्ट्सनंतर आता ती ‘शक’मध्ये दिसत आहे. आपल्या भूमिकांमधून हरलीनने सिद्ध केले आहे की, तिला स्वतःला केवळ नायिकेच्या पारंपरिक प्रतिमेपुरते मर्यादित ठेवायचे नाही. दैनिक भास्करशी झालेल्या विशेष संवादात…

Read More

नाशिक:उमराणेतील हॉटेलची भिंत फोडून 1.40 लाख लंपास

येथील इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ‘इच्छापूर्ती हॉटेल’ची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री १ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हॉटेलचे मालक दादाजी जाधव व त्यांचे भाऊ रात्री हॉटेल बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मागील भिंतीला भगदाड पाडून हॉटेलमध्ये प्रवेश…

Read More

मनमाडमध्ये जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डीचा थरार; 32 संघ मैदानात:उद्या अंतिम सामना; विजेत्यां खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार निवड‎

येथे ५३ व्या नाशिक जिल्हा कुमार गट मुले कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेला शुक्रवारी (दि. २) उत्साहात सुरुवात झाली. जय भवानी अद्ययावत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात १६ संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने झाले. त्यानंतर…

Read More