Headlines

कौटुंबिक वादातून काकूने ओतले नऊमहिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात फेविक्विक:पुण्यातील घटना, बालकाच्या तोंडात जखमा, तिघांवर गुन्हा दाखल



लोहगाव येथे कौटुंबिक वादातून काकूने ९ महिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात फेविक्विक ओतले. यामुळे बालकाच्या तोंडात जखमा झाल्या असून त्याच्यावर ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

.

अल्ताफ नबी शेख (३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सानिया शेख (रा. लोहगाव), रियाज इमाम हल्याळ आणि हाजी मलंग शेख (दोघे रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अल्ताफ आणि त्यांचा भाऊ कुटुंबासह लोहगावमध्ये एकत्र राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून नेहमी वाद होत होते. यातूनच ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भावजयी सानिया हिने अल्ताफ यांच्या मुलाच्या तोंडात फेविक्विक ओतले. मुलाची आई जैनब यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने कामावर असलेल्या पतीशी संपर्क साधला आणि बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले.

इथाइल सायनो ॲक्रिलेट घातक

फेविक्विकचा मुख्य आणि सक्रिय रासायनिक घटक इथाइल सायनो ॲक्रिलेट आहे. हे रसायन द्रवरूपात असते. ते त्वचेला अत्यंत घट्ट चिकटते. त्यामुळे त्वचा ओढली जाऊनही जखम होऊ शकते. दरम्यान, जैनबला धमकावल्याप्रकरणी सानिया व तिचे मुंबईतील नातेवाईक यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *