जिल्ह्यातील 8300 मेडिकल शटर राहिले बंद:ऑनलाइन औषध विक्री विरोधात केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशनचा संप, जिल्ह्यात प्रतिसाद
ऑनलाइन औषध विक्री आणि ई-पोर्टल्सच्या मनमानी कारभाराविरोधात अहिल्यानगर जिल्हा आणि शहरातील औषध विक्रेत्यांनी बुधवार (२० मे) रोजी कडकडीत बंद पाळला. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार, अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला होता. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ३०० लहान-मोठ्या औषध विक्रेत्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली. या आंदोलनादरम्यान…