Headlines

विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी केली:मोर्शी, दर्यापूर, अंजनगावात दौरा; सदस्यसंख्या 10 वर पोहोचली

अमरावती: विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांचा समावेश असलेल्या विधिमंडळाच्या अंदाज समितीने अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांची पाहणी केली. समितीने स्वतःला चार गटांमध्ये विभागले होते. आमदार कृष्णा खोपडे आणि आमदार बालाजी कल्याणकर हे दोन नवीन सदस्य अमरावतीत दाखल झाल्याने समितीतील सदस्यांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे. २९ सदस्यीय अंदाज समितीतील केवळ आठ सदस्य मंगळवारी अमरावतीत…

Read More

विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ….

Read More

Hingoli Free Hostel Admission: Apply Until July 2026

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत हिंगोली जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह हिंगोली, कळमनुरी,…

Read More

जगभरात खाद्यपदार्थ 3 वर्षांत सर्वात महाग:अमेरिका-इराण युद्धामुळे पुरवठा साखळी तुटण्याचा परिणाम, UN म्हणाला- आता आणखी वाढतील दर

अमेरिका-इराण यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगभरातील स्वयंपाकघरांवर दिसू लागला आहे. युनायटेड नेशन्स (UN) च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर अन्नपदार्थांच्या किमती गेल्या तीन वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत. तर, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) ने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये अन्नधान्य वस्तूंच्या किंमत निर्देशांकात 1.6% वाढ झाली आहे. ही वाढ मागील वर्षाच्या तुलनेत 2.5% जास्त आहे. या…

Read More

विठ्ठल मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित:जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश; आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार‎

आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर शहरातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ (ब) नुसार मंदिर परिसर ‘वाहन प्रतिबंध क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ए . ​आषाढी यात्रा कालावधीत श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा, विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार आणि महाद्वार चौक परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. भाविक येथूनच…

Read More

योग भारताचा प्राचीन, समृद्ध आणि गौरवशाली वारसा!:मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील जुहू बीच येथे 12व्या भव्य आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ‘योगा ऑन द बीच’ कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात सहभागी होत योगासने केली. यावर्षीचा योग दिन ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित असून, मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसह या सोहळ्यात उत्साहाने भाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Read More

राऊतांनी पाकिस्तानची चाटुगिरी थांबवावी:अफजल खानाच्या दाढ्या कुरवळणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये– नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काय आहे हे भारतामधील लोकांना माहिती आहे.संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची चाटुगिरी करू नका, त्यांची प्रवक्तेगिरी करू नका. पाकिस्तानचे उदो उदो करण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पाकिस्तानने इराण-अमेरिकेमध्ये दलाली करण्याचे काम केले आहे. हे करण्यापेक्षा तिथल्या समस्याकडे जर त्यांनी…

Read More

समय रैनाच्या वादग्रस्त शोवर सुनील पाल यांचा दावा:'लेटेंट' मध्ये येण्यासाठी 25 लाखांची ऑफर मिळाली, म्हणाले- शिवीगाळ मान्य नाही

कॉमेडियन सुनील पाल यांनी समय रैनाच्या वादग्रस्त शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये सहभागी होण्याबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. गुरुवारी मीडियाशी बोलताना त्यांनी दावा केला की, समय रैनाने त्यांना शोमध्ये येण्यासाठी 25 लाख रुपयांची ऑफर दिली होती. गुरुवारी ते ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट पाहण्यासाठी जात होते. यावेळी पापाराझींशी बोलताना सुनील म्हणाले, “समय रैनाचे जवळपास 11…

Read More

टीईटी पेपरफुटीवरून काँग्रेस आक्रमक:शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे, राजीनाम्याची मागणी

राज्यात टीईटी (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट असतानाच, आता या प्रकरणाचे थेट पडसाद रस्त्यावर उमटू लागले आहेत. टीईटी पेपरफुटीच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत तो अडवण्याचा प्रयत्न केला. “भ्रष्ट सरकारचा निषेध असो”, “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या आक्रमक…

Read More

लग्न करून देत नसल्याच्या गैरसमजातून धुळ्यात तरुणाने आईला जिवंत जाळले:मुलाकडून अपघाताचा बनाव, पण आईच्या मृत्यूपूर्व जबाबदातून सत्य उघड

आपले लग्न लावून देत नाही, या गैरसमजातून धुळे तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. प्रदीप ऊर्फ दगडू खैरनार-पाटील (वय 45) या मद्यधुंद मुलाने आपली 65 वर्षीय वृद्ध आई जिजाबाई यांच्या अंगावर थिनर ओतून त्यांना जिवंत जाळले. उपचारादरम्यान या दुर्दैवी मातेची प्राणज्योत मालवली. पोलिसांनुसार, प्रदीप याचे अद्याप लग्न झालेले नव्हते. आईमुळेच आपले लग्न जमत…

Read More