- Marathi News
- National
- Police Raid Abhishek Banerjee’s House At 2 Am, Banerjee Alleges That The Police Broke The Gate And Entered The House.
काेलकाता2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

कोलकात्यात शुक्रवारच्या मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरावर छापा टाकला. पोलिस अधिकारी आत गेले, तर जवान गेटबाहेर पहारा देत राहिले. ही मोहीम ४ तास चालली. माहिती मिळताच ममता बॅनर्जी अभिषेक यांच्या घरी आल्या व झडती संपेपर्यंत तिथेच थांबल्या. पोलिसांनी बॅनर्जींचे पीए सुमीत रॉय यांच्या शोधात ही कारवाई केली.
फरार पीएच्या शोधात गेले
- सुमीत यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.रॉय यांचे मोबाइल लोकेशन बॅनर्जींच्या निवासस्थानी ट्रेस झाल्याने पोलिसांनी छापा टाकला.
- पोलिसांनी कुलूप तोडून घरात घुसत प्रत्येक खोलीची झडती घेतली, असा आरोप अभिषेक यांनी केला.
- पोलिसांनुसार, पथकाने घराचा दरवाजा अनेकदा ठोठावला.
- प्रतिसाद मिळाला नाही. पथक ४ तास बाहेर उभे राहिले.