Headlines

Satyaki Savarkar Legal Action Against Sonia Gandhi; Belonging Book Row


काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमानजनक उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पुस्तकाची पाने फाडल्यानंतर आता या वादाने कायदे

.

राहुल गांधींना कोर्टाने दणका दिलाय, आता सोनिया गांधींनाही सोडणार नाही

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सात्यकी सावरकर यांनी आपली कायदेशीर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “मी गेल्या 2 दिवसांपासून कर्नाटकात होतो. तिथे युवा ब्रिगेडने सावरकरांच्या संदर्भातील एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता, त्यात मी व्यस्त होतो. मला सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह उल्लेखाबाबत समजले आहे. मी अद्याप ते पुस्तक वाचलेले नाही.”

यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर तथ्यहीन आणि संदर्भहीन भाष्य केले होते, ज्याविरोधात सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधींना दणका दिला असल्याची आठवण करून देत सात्यकी सावरकर म्हणाले की, “आता मी सोनिया गांधी यांचे हे पुस्तक वाचणार आहे. ते वाचताना मला सावरकरांच्या संदर्भात तथ्यहीन आरोप किंवा ‘माफीवीर’सारखे आक्षेपार्ह उल्लेख आढळून आले, तर मी निश्चितपणे कायदेशीर सल्ला घेणार आहे आणि सोनिया गांधी यांनाही कोर्टात खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.”

सोनिया गांधींच्या पुस्तकावरून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील मजकुरावरून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

उद्धव ठाकरेंनी ‘सामना’तून भूमिका मांडावी -नीलम गोऱ्हे: सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात अत्यंत दांभिकपणे लिखाण केले आहे. या पुस्तकात सावरकरांबाबत जे काही आक्षेपार्ह लिहिले आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’मधून आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे थेट आव्हान शिवसेना (शिंदे गट) नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.

आमची भूमिका बदललेली नाही -संजय राऊत: सोनिया गांधी यांच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काही आक्षेपार्ह मजकूर असेल, तर आम्ही त्यावर निश्चितपणे बोलू. सावरकरांबाबतची आमची भूमिका अजिबात बदललेली नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आक्षेप घेणे हा त्यांचा अधिकार -जयकुमार गोरे: मी अद्याप ते पुस्तक पाहिलेले नाही आणि मला ते वाचायचेही नाही; मात्र ज्यांना त्यातील काही गोष्टी आक्षेपार्ह वाटल्या असतील, तर त्यावर आक्षेप घेणे हा त्यांचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.

फोटो फाडल्याचा वाद, शायना एनसी यांचा अखेर माफीनामा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराचा निषेध करताना पत्रकार परिषदेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेले पान फाटल्याच्या वादावरून शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट करत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझ्या कृतीचा आणि वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करून राजकारण केले जात आहे. बाळासाहेब माझ्यासाठी पितृतुल्य आणि देवतुल्य व्यक्तिमत्त्व होते; तरीही माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते,” असे शायना एन. सी. यांनी म्हटले आहे. गुरुवारी (19 नोव्हेंबर) ‘एक्स’वर (ट्विटर) एक सविस्तर पोस्ट शेअर करत त्यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला.

बाळासाहेबांचा फोटो फाटल्याप्रकरणी माहूरमध्ये शिवसैनिक आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

एकीकडे सोनिया गांधींच्या पुस्तकावरून वाद सुरू असतानाच, या पुस्तकाचा निषेध करताना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्या हातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाटल्यामुळे राज्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून शिंदे गट आणि शायना एन. सी. यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडून तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी शायना एन. सी. यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारे निवेदन आंदोलकांनी माहूर पोलिसांना दिले आहे. तर, बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नसून सत्तेच्या आणि स्वार्थाच्या राजकारणापलीकडे बाळासाहेबांशी ऋणानुबंध असल्याचे सांगत नेत्या सुशिबेन शहा यांनी या वादावर भाष्य केले आहे.

———————————————————

हेही वाचा…

20 वर्षे काँग्रेसमध्ये पदे भोगताना सावरकरांचा अपमान दिसला नाही का?: सोनिया गांधींचे पुस्तक फाडणाऱ्या शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची अखिल चित्रेंनी काढली कुंडली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत पुस्तकाची पाने फाडल्यानंतर आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. ज्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनिया गांधींवर टीका केली, त्यातील प्रमुख सूत्रधार हे स्वतः अनेक दशके काँग्रेसमध्येच कार्यरत होते, याची आठवण करून देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अखिल चित्रे यांनी शिंदे गटावर जोरदार पलटवार केला आहे. समाजमाध्यम ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत चित्रे यांनी संजय निरुपम, आनंद दुबे आणि सुशिबेन शहा यांच्या जुन्या काँग्रेस कारकीर्दीचा पाढा वाचत, “राजकीय सोयीनुसार जागे होणारे हे सावरकरप्रेम आहे,” असा सणसणीत टोला लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.