![]()
.
विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांताच्या वतीने मातृशक्ती आयामच्या अभ्यास वर्गाचा समारोप रविवारी झाला. अभ्यास वर्गात विदर्भ प्रांतातील २०० पदाधिकारी महिलांनी सहभाग नोंदवला होता.
अभ्यासवर्ग किर्ती नगर परिसरातील जुना आरटीओ कार्यालयानजीकच्या महेश भवन येथे पडला. मातृशक्ती आयमाद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली.
प्रशिक्षण वर्गात विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र आणि प्रांताच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. संघटनात्मक ध्येय याला लक्षात घेऊन वर्गाचा समारोप करण्यात आला. रविवारी मातृशक्ती आयमाद्वारे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत राष्ट्र आणि संस्कृतीच्या रक्षणाचा संकल्प घेण्यात आला.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमास प्रतिभा बोथारे, गोदावरी बंड, चंद्रप्रकाश लढ्ढा, शिशुगृह अध्यक्षा मीरा जोशी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रांत सहमंत्री गणेश काळकर, मातृशक्तीच्या प्रांत संयोजिका लीना सोइंदे, दीपाली गंगावणे, अनिता काकड, मीना तडोकार, सीमा दातीर, शिल्पा राजवैद्य, नेहा दुबे, कल्पना पाठक, गोपाल राज्यवैद्य ,संजय दुबे, राजू मंजूळकर, शाम वक्ते, नीलेश पाठक आदींसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
प्रात्यक्षिकांचे सादरीकरण शोभायात्रेत महिलांनी वीरांगणांच्या विविध वेशभूषा धारण केल्या होत्या. या यात्रेत दंड, यष्टी यांची प्रात्यक्षिके सादर केली. ही शोभायात्रा मलकापूर येथील जुन्या ग्रामपंचायत येथून झाली. शोभा यात्रा बसेरा कॉलनी ते गायत्री बालिकाश्रमापर्यंत काढण्यात आली. गायत्री बालिकाश्रम येथे या शोभायात्रेचा समारोप झाला.