Headlines

Urgen Art Festival 2026 in Pune



पुण्यात 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान ‘उर्गेंन आर्ट फेस्टिव्हल 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. करुणादिप फाउंडेशन आणि त्रिरत्न वैरोचना सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा तीन दिवसीय महोत्सव पार पडणार आहे. यात चित्रप्रदर्शने, ध्यान कार्यशाळा, कलाकार व साहित्यि

.

या महोत्सवाची माहिती माजी चीफ मेडिकल ऑफिसर, डिफेन्स इस्टेट आणि करुणादीप फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. जीवक उर्फ व्ही. डी. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. अस्मिता गायकवाड (डायरेक्टर फोर्टरिया आणि उपाध्यक्षा, करुणादीप फाऊंडेशन), जागतिक कीर्तीचे चित्रकार सविंद्र सावरकर आणि कलादिग्दर्शक संतोष संखद आदी मान्यवर उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्घाटन 1 सप्टेंबर रोजी बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. ज्येष्ठ चित्रकार सवी सावरकर यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी होईल. या प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखादेव थोरात, अभिनेते किरण माने आणि ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी 3 वाजता चित्रकलेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि सायंकाळी 5 वाजता ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ल’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाईल.

2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ‘कलाकार परिसंवाद’ होईल, ज्यात पद्मश्री सुधारक ओलवे, मोगाल्लान श्रावस्ती, सवी सावरकर आणि संजय जीवने सहभागी होणार आहेत. दुपारी 3 वाजता शिल्पकलेचे प्रदर्शन तर सायंकाळी 5 वाजता क्रांतीमा आणि कबीर या नाटिकांचे सादरीकरण होणार आहे.

3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ध्यान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर साहित्यिक परिसंवाद होईल, ज्यात पद्मश्री ग्नंवाग संपतेन, डॉ. विमलताई एस. थोरात आणि शाहीर संभाजी भगत यांची प्रमुख उपस्थिती असेल. दुपारी 3 वाजता कॅलिग्राफी प्रदर्शन आणि सायंकाळी ५ वाजता ‘स्टोरी शिवराज्याभिषेकाची’ या नाटकाचे सादरीकरण होईल.

बालगंधर्व मंदिर परिसरातील विविध सभागृहांमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. कला, साहित्य, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील रसिकांसाठी हा महोत्सव एक पर्वणी ठरेल, असे आयोजकांनी सांगितले. नाटकांसाठी विनामूल्य प्रवेशिका 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे उपलब्ध असतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *