Headlines

VHP Leader Rupesh Raut Accused Molestation Attempt Sexual Assault Amravati


परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाची शाई अद्याप वाळली नसतानाच, अमरावती जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर एका महिलेचा विनयभंग आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिव

.

मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश राऊत असे आरोपीचे नाव असून, तो विश्व हिंदू परिषदेत जिल्हा महामंत्री म्हणून काम पाहतो. आरोपी रुपेश राऊत हा गेल्या काही दिवसांपासून पीडित महिलेला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. त्याने मोबाईलवर अश्लील संभाषण करत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने जेव्हा आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याचे घर गाठले, तेव्हा आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आरोपीसोबत झालेल्या झटापटीत पीडितेचे मंगळसूत्रही तुटले. महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले आणि त्यांनी महिलेची सुटका केली. या गंभीर प्रकारानंतर पीडितेने तात्काळ तिवसा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुपेश राऊत विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन २४ तासांहून अधिक काळ लोटला असला तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला बेड्या ठोकलेल्या नाहीत. आरोपी हा एका मोठ्या हिंदू संघटनेचा जिल्हास्तरावरील पदाधिकारी असल्यानेच पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

आरोपी फरार, नागरिकांमध्ये संताप

सध्या आरोपी रुपेश राऊत हा आपल्या घरातून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका बाजूला महिलांच्या सन्मानासाठी लढण्याचे दावे करायचे आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याला संघटनेने अद्याप पदावरून दूर का केले नाही? असाही प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.

180 तरुणींचे लैंगिक शोषण

दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. आरोपीने 200 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याच्यासह इतर आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा…

पहिल्या ब्रेकअपनंतर बनला प्लेबॉय:अयान अहमदचे धक्कादायक कबुलीजबाब; एमआयएमचे सोशल मीडिया हँडल देखील सांभाळत होता

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत आहेत. चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर मी प्लेबॉय बनलो, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार मानसिक आजारामुळे नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीतून आणि विकृत विचारसरणीतून घडलेला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.